पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य आत्म्याशी एकरूपत्व उपलब्ध होण्याकरितां सर्व वेदांत उत्पन्न झाले आहेत.' ज्या पूर्वपक्षकारासंबंधाने रामानुजाचार्यांनी वर निर्दिष्ट केलेला उद्गार काढला आहे, त्या पूर्वपक्षाने प्रतिपादित मताचा हा जो संक्षेप तो ज्या शब्दांनी व्यक्त केलेली आहे, ते शब्द तरी शंकराचार्यांचे आहेत, असे शारारिक भाष्यांतील पुढील उता-यांवरून स्पष्ट होतें:--अस्ति तावत् । ब्रह्म नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव सर्वज्ञं सर्वशक्तिसमन्वितम् ॥ १॥ १॥ १. झणजे, * स्वभावतःच नित्य, शुद्ध, मुक्त, ज्ञानमय एतत्स्वरूप ब्रह्म विद्यमान असून ते सर्वज्ञ व सर्वशक्ति आहे. सन्ति उभयलिंगाः श्रुतयः ब्रह्मविषयाः,००० सविशेषलिंगाः....च निर्विशेषलिंगाः । किं आसु श्रुतिषु उभयलिंगं ब्रह्म प्रतिपत्तव्यं उत अन्यतरलिंगम् । यदापि अन्य तरलिंगं तदापि किं सविशेष उत निर्विशेष इति मीमांस्यते । ....न तावत् स्वतः एव परस्य ब्रम्हणः उभयलिंगत्वं उपपद्यते....विरोधात् । ...अतः च अन्यतरलिंगपरिग्रहे अपि समस्तविशेषरहितं निर्विकल्पक एवं ब्रह्म प्रतिपत्तव्यं, न तत्–विपरीतम् ॥ ३॥ २॥ ११. ह्मणजे, * श्रुतीमध्ये दोन्ही प्रकारची ब्रह्मविषयक वचने आहेत. कांहीं वचनांमध्ये ब्रह्याचे निर्गुणत्व वर्णन केलेले आहे, आणि कांहीं बचनामध्ये ब्रह्माचे सगुणत्व वर्णन केलेले आहे. तर ही दोन्ही वर्णने यथार्थ मानावयाची किंवा यांपैकी एकच यथार्थ मानावयाचें ? आणि