पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ वैदिक तत्त्वमीमांसा झालेले असून ते विवेकापुढे टिकणे शक्य नाही. आणि याकरितां ज्यांना न्यायशास्त्र, श्रुति, आणि प्रत्यक्षादि सर्व प्रमाणे यांच्या योगाने सिद्ध होणारे जे सत्य तें अवगत आहे, त्यांनी या मताचा अनादर करणेच योग्य होय. - श्रीभाष्यांत शंकराचार्यांना नांवाने निर्देश केलेला जरी कोठे आढळत नाही, तरी रामानुजाचायचा हो उद्गार शंकराचार्य व शंकराचार्यांचे मत यांनाच अनुलक्षून आहे, असे समजले जाते. आणि हा समज बरोबर आहे, असे | वरील पूर्वपक्षाचा रामानुजाचार्यांनी स्वतःच जो संक्षेप दिला आहे, त्यावरून सिद्ध होते. तो संक्षेप असाः-- तस्मात् परमार्थतः निरस्त–समस्त-भेद-विकल्प-निर्विशेषचिन्मात्र–एकरस-कूटस्थ-नित्य-संविद् एव भ्रान्त्या ज्ञातृज्ञेय-ज्ञानरूप-विविध-विचित्रभेदाः विवर्तते,-इति तत्मूल-भूत-अविद्या-निबर्हणाय नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव-ब्रह्म-आत्मैकत्व-विद्या–प्रतिपत्तये सर्वे वेदान्ताः आरभ्यन्ते ।। ह्मणजे, * वरील विवेचनापासून असे सिद्ध होते की, वस्तुतः भेदरहित विकल्परहित विशेषरहित आणि विकाररहित, असे शुद्ध चैतन्यस्वरूप जे विज्ञानमयब्रह्म ते भ्रांतीच्या योगाने ज्ञाता ज्ञेय ज्ञान एतस्वरूप नाना प्रकारच्या विचित्र भेदांच्या रूपानें प्रकट होते. ह्मणून त्या सर्व भेदांचे मूळ जी भ्रांति तिचा नाश होऊन, स्वभावतःच नित्य, शुद्ध, मुक्त, ज्ञानमय, असे जें ब्रह्म त्याचे