पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ वैदिक तत्त्वमीमांसा । त्म्याच्या अनुभवाला येणारे जे इंद्रियविषयक सुखदुःख, त्याच्या योगाने आपण असे अनुमान करितों कीं; तो इंद्रियांचे नियमन कारतो. परंतु ईश्वराला प्रधानविषयक सुखदुःखाचा अनुभव येतो असे मानितां येत नाहीं परंतु जर असे मानलें कीं, इंद्रियांच्या योगाने जीवात्म्याला सुखदुःख प्राप्त होते, त्या प्रमाणेच प्रधानाच्या योगाने ईश्वराला सुखदुःख प्राप्त होते; तर मग संसाराने बद्ध जो जीवात्मा तो आणि ईश्वर, यांच्या मध्ये कांहींच भेद राहणार नाहीं. सारांशः–तस्मात् अपि असंगतः तार्किक-पारगृहीतः ईश्वर-कारण-वादः ॥ (शारीरकभाष्य, २।२।४.१ ) ह्मणजे, “ या विवेचना वरून असे सिद्ध होते की, श्रुतीच्या आधारा शिवाय केवळ तर्कानें स्थापित केलेला असा जो हा ईश्वरकारणवाद, तो सयुक्तिक नव्हे.' या ईश्वरकारणवादा संबंधाने, रामानुजाचायचे ह्मणणे असेः-वेद-विरुद्धं च इंद तत्त्व-परिकल्पनम्....। वेदाः खलुः परं ब्रह्म नारायणं, एव. जगत्-निमित्तं उपादानं च वदन्ति ।.... अतः वेद-विरुद्ध-तत्त्व-.... अभिधानात् पशुपति - मतं अनादरणीयं एव ।। ( श्रीभाष्य, २।२।३६ ) झणजे, पशुपतिवादी ( ह्मणजे पूर्वोक्त ईश्वरकारणवादी) जगाच्या कारणा विषयीं जें प्रतिपादन करतो, ते श्रुतीच्या विरुद्ध आहे. कारण श्रुती मध्ये असे सांगितले आहे की नारायण नामक जें, परब्रह्म तेच एक सर्व जगाचे निमित्त (१) अपौरुषेय-श्रुति-सिद्ध-ईश्वरस्य न निरासः अस्ति । किक-विशेषणम् ॥ ( आनंदगिरि ), ... ।