पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७९ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य आणि सांख्यांनी प्रतिपादित जे प्रधान ते जगाचे उपादान कारण. वैदिक वाङ्मया मध्ये हे मत ईश्वरकारणवाद या नांवाने प्रसिद्ध आहे. परंतु शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांनाही हे मत देखील मान्य नाहीं. * शंकराचार्यांच्या भाषेनें हैं मत असेः इदानीं कैवलअधिष्ठातृ-ईश्वर-कारण-वादः प्रतिषिध्यते । अप्रकृतिः अधिछाता केवलं निमित्त कारणं ईश्वरः इति एषः पक्षः ।.... सा च इयं वेद-बाह्या ईश्वर-कल्पना अनेक-प्रकारा।। केचित् तावत् सांख्य-योग-व्यपाश्रयाः कल्पयन्ति। प्रधानपुरुषयोः अधिष्ठाता केवलं निमित्त-कारणं ईश्वरः, इतरेतर-विलक्षणाः प्रधान–पुरुष-ईश्वराः इति ॥ (शारीरकभाष्य, २।२।३७) ह्मणजे, ‘ईश्वर केवळ नियमन करून जग निर्माण करितो, या मताचें आतां खंडन करावयाचे आहे. हे मत असे की, सर्वांचे नियमन करणारा जो ईश्वर तो जगाचे केवळ निमित्तकारण होय,-उपादानकारण नव्हे. श्रुतीला आधारभूत न धरितां केवळ तक वर स्थापन झालेल्या या ईश्वरकारणवादाचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारां पैकी एक असा की, प्रधान जीवात्मा आणि ईश्वर हे परस्परांहून भिन्न स्वभावाचे असून, प्रधान व पुरुष यांचे नियमन करने, णारा जो ईश्वर तो जगाचे केवळ निमित्तकारण आहे.' रामानुजाचार्यांच्या भाषेनें हा, ईश्वरकास्णवाद असाःकपिल-कणाद्-सुगत-....मतानां असामंजस्यात् वेदबाह्य (१) प्रधीयते इति प्रधानस्य अविद्यात्वात् प्रधान-पुरुषअधिष्ठाता ईश्वरः अस्माभिः अपि गृह्यते, तत्र आह-* इतर' इति ।। ( आनंदगिरि )