पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २७३ मानिले तर ते नेहमी प्रवृत्तियुक्त असल्या मुळे प्रळयस्थिति शक्य होणार नाही. जर परमाणु स्वभावतः निवृत्तियुक्त आहेत असे मानले, तर त्यांच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होणे सर्वथैव अशक्य असल्या मुळे, जगाची उत्पत्ति शक्य होणार नाहीं. परमाणु स्वभावतः प्रवृत्तियुक्त व निवृत्तियुक्त असणें आत्मविरुद्ध असल्या मुळे, हा पक्षांतर सर्वथैव त्याज्य होय. आतां जर असे मानलें कीं, परमाणु स्वभावतः प्रवृत्तियुक्तही नाहींत व निवृत्तियुक्तही नाहींत; तर असे देखील कबूल करावे लागेल की, ज्या बाह्य कारणाचा त्यांच्या वर व्यापार घडेल त्या कारणानुरूप त्यांच्या मध्ये प्रवृत्ति किंवा निवृत्ति उत्पन्न होते. परंतु ही गोष्ट कबूल केली ह्मणजे मग असे देखील कबूल करावे लागेल की, अदृष्ट वगैरे कारणे नित्य असून त्यांचा त्यांच्या वर सतत व्यापार घडत असल्या मुळे त्यांच्या मध्ये निरंतर प्रवृत्ति उत्पन्न होते; किंवा ती नित्य असून देखील जर त्यांचा त्यांच्या वर केव्हाही व्यापार घडत नसेल तर त्यांच्या मध्ये केव्हाही प्रवृत्ति उत्पन्न होत नाही. या वरून देखील असे सिद्ध होते की, परमाणु कारणवाद सयुक्तिक नव्हे.' . या प्रमाणे निरनिराळ्या दृष्टींनीं परमाणु कारणवादाचें खेडन करून शेवटी शंकराचार्यांनी असे ह्मटलें आहेः-प्रधानकारण-वादः वेदविद्भिः अपि कैश्चित् मन्वादिभिः सत्कार्यत्वादि-अंश-उपजीवन-अभिप्रायेण उपनिबद्धः । अयं तु परमाणु-कारणवादः न कैश्चित् अपि शिष्टैः केनचित् ( १ ) आदि-शद्वेन आत्मनः असंगत्व--चिद्रूपत्वादि गृह्यते ।। ( आनंदगिरि )