पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य आतां ही गोष्ट सर्वांनी कबूल केली पाहिजे की, अशा प्रकारची भाष्ये उत्पन्न होऊन ती सामान्य लोकांनी मूळ ग्रंथांतील भाषेच्या अर्थसंबंधाने प्रमाणभूत मानणें है, भाषाशास्त्राच्या व इतिहासशास्त्राच्या दृष्टीनें, एक अनिष्ट अ हे. व ते अनिष्ट नष्ट करण्याकरितां भाषाशास्त्रमीमांसकांनी व इतिहासशास्त्रमीमांसकांनी प्रयत्न केले पाहिजेत, या संबंधाने देखील तिळग्राय संशय नाहीं. तथापि ते प्रयत्न करीत असतां त्यांनीं, व विशेषतः जे स्वतः भाषाशास्त्रमीमांसक किंवा इतिहासशास्त्रमीमांसक नाहींत अशा सर्व समंजस मनुष्यांनी, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांसंबंधाने दोन गोष्टी लक्षात ठेविल्या पाहिजेत. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट अशी की, जे ग्रंथ ईश्वरप्रणीत अशी त्यांची श्रद्धा त्या मूळ ग्रंथांतील भाषेची चाटेल तशी व वाटेल तितकी ओढाताण' करणे या । दोषाला शंकराचार्य व रामानुजाचार्य हे दोघेच पात्र आहेत ( १ ) प्रसिद्ध ओरिएंटल स्कॉलर डॉ. थोबो यांचे मत असे आहे की, रामानुजाचार्यांच्या भाष्यापेक्षां शंकराचार्यांच्या भाड्याने उपनिषदांतील सर्व विचारांची अधिक चांगली संगति लागते इतकेच नव्हे, तर त्या भाष्यांत उपनिषदांतील मुख्य सिद्धांतांची कमी ‘ओढाताण झालेली आहेः-The task of reducing the teaching of the whole of the Upanishads... once being given, we are quite ready to admit that Shankar's system is most probably