पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । २६५ युक्त असल्या मुळे, ती सर्व परमाणूंच्या योगानेच बनलेली आहेत. अर्थात् , त्यांच्या मते परमाणूंचे चार प्रकार आहेत. आणि जगांतील सर्व वस्तूंचे पृथक्करण होत होत त्यांचे चरील चार मूळ द्रव्यां मध्ये रूपांतर झालें, व त्या द्रव्यांचे परमाणू मध्ये रूपांतर झाले, ह्मणजे प्रळयकाळ सुरू होतो. पुढे उत्पत्तिकाळाला आरंभ होण्याच्या वेळीं वायुरूप मूळ द्रव्याचे जे परमाणु त्यांच्या मध्ये अदृष्टाच्या योगाने गति उत्पन्न होऊन, त्या गतीच्या योगानें वायूचे अवयव परस्पराशीं संयुक्त होतात. व त्यांच्या या संयोगाच्या योगाने वायुरूप मूळ द्रव्य उत्पन्न होते. त्या प्रमाणेच तेज उदक व पृथ्वी ही मूळ द्रव्ये उत्पन्न होतात. त्याच पद्धतीने शरीर व इंद्रियें उत्पन्न होतात. आणि त्याच पद्धतीने हे सर्व जग परमाणू पासून उत्पन्न होते. आणि परमाणुवादी असे देखील प्रतिपादन करितात की, ज्या प्रमाणे तंतूंतील धर्म वत्रा मध्ये आढळतात; त्या प्रमाणेच परमाणूचे जे रूप वगैरे धर्म ते परमाणूंच्या समुदायां मध्ये आढळतात.' रामानुजाचार्यांच्या भाषेने हे मत असेंः-संप्रति परमाणु-कारण-वादस्य अपि असामंजस्यं प्रतिपाद्यते ।.... परमाणु-कारण-वादे हि परमाणु-गत-कर्म-जनित-तत्संयोग-पूर्वक-द्वि-अणुकादि-क्रमेण जगत्-उत्पत्तिः इध्यते । तत्र निखिल–जगत्-उत्पत्ति-कारणभूत-परमाणुगतं आद्यं कर्म अदृष्ट-कारितं इति अभ्युपगम्यते ॥ ( श्रीभाष्य, २।२।११ ) ह्मणजे, ' आतां परमाणुवाद देखील असयुक्तिक आहे असे प्रतिपादन करावयाचे आहे. परमाणुवादीचे झणणे असे की, परमाणू मध्ये विद्यमान अस