पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ वैदिक तत्त्वमीमांसा क्रमेण वायुः उत्पद्यते । एवं अग्निः एवं आपः एवं पृथिवी । एवं एव शरीरं सेन्द्रियं इति । एवं सर्व इदं जगत् अणुभ्यः संभवति । अणुगतेभ्यः च रूपादिभ्यः द्वि-अणुकादि-गतानि रूपादीनि संभवन्ति तन्तुपट-न्यायेन इति काणादाः मन्यन्ते ।। (शारीरकभाष्य२।२।१२) ह्मणजे, “आतां परमाणु कारण वादाचे खंडन करावयाचे आहे. हा परमाणु कारण वाद असे प्रतिपादन करतो. व्यवहारा मध्ये आपला असा अनुभव आहे कीं, ज्यांचे विभाग करितां येतात अशीं जी वस्त्र वगैरे द्रव्ये ती तंतु वगैरे जे त्यांचे अवयव त्यांच्या संयोगाच्या योगाने बनलेली असतात. आणि या आपल्या अनुभवा वरून आपणांला असे अनुमान करितां येते की, वस्रा प्रमाणेच ज्या अवयवयुक्त वस्तु, त्या सर्व आपापल्या अवयवांच्या संयोगाच्या योगानेच बनलेल्या असतात. आता कोणतीही अवयवयुक्त वस्तु घेऊन जर आपण तिचे विभाग केले, त्या विभागांचे पुनः विभाग केले, आणि असे करीत करीत शेवटीं असे विभाग केले की, त्या विभागांचे पुनः विभाग करणे शक्य नाही. तर हे जे त्या वस्तूचे अविभाग्य विभाग ते ( प्रस्तुत मताच्या भाषेनें ) त्या वस्तूचे परमाणु. आणि पर्वत समुद्र वगैरे हे जे दृश्यमान जग ते सर्व अवयवयुक्त असल्या मुळे ते उत्पन्न झालेले असून विनाशी आहे. अर्थात् , तें कार्यरूप आहे. परंतु कारणा शिवाय कोणतेही कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. या करितां परमाणुवादी असे प्रतिपादन करितात कीं, परमाणु हेच जगाचे कारण. अर्थात् , ते असे देखील प्रतिपादन करितात की, पृथ्वी उदक वायु आणि तेज ही जी मूळ द्रव्ये ती देखील अवयव