पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य. २६१ विचित्र -सृष्टि-व्यवस्था--सिद्भिः ॥ ( श्रीभाष्य, २।२।३ ) ह्मणजे, जरी सत्यसंकल्प ईश्वरा कडून नियमन केले गेल्या शिवाय प्रधाना पासून जग उत्पन्न होऊ शकेल असे गृहीत धरिलें, तरी जगाच्या उत्पत्तिरूप स्थितीहून भिन्न अशी जी जगाची. प्रळयस्थिति ती उत्पन्न होणे शक्य होणार नाही. या करितां ( सांख्यांच्या मते ) चैतन्यरूप शक्तीनें अनियत असे जे प्रधान, ते जगाचे कारण असणे शक्य नाही. परंतु चैतन्यरूप जो ईश्वर, त्याच्या कडून जर प्रधानाचे नियमन केले जात असेल, तर मात्र तो सत्यसंकल्प असल्या मुळे जगाची उत्पत्ति, जगाचा लय, जगाची विचित्र रचना, या सर्व गोष्टींची व्यवस्था लागते.