पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३५९ परंतु सांख्यांची ही विचारसरणी देखील रामानुजाचायौना मान्य नाहींः–एवं अपि प्रधानस्य प्रवृत्त-असंभवः तत्-अवस्थः एव । पंगोः गमन-शक्ति-विकलस्य अपि मार्ग-दर्शन-तत्-उपदेशादयः कादाचित्काः विशेषाः सहस्रशः सन्ति । अन्धः अपि चेतनः सन् तत-उपदेशादिअवगमेन प्रवर्तते । तथा अयस्कान्त-मणेः अपि अयःसमीप-गमनादयः सन्ति । पुरुषस्य तु निष्क्रियस्य न तादृशाः विकाराः संभवन्ति । संनिधानमात्रस्य नित्यत्वेन नित्यसर्ग-प्रसंगः । नित्य-मुक्तत्वेन बन्ध-अभावः अपवर्गअभावः च ॥ ( श्रीभाष्य, २।२।९ ) ह्मणजे, “या विचारसरणीने देखील प्रधाना मध्ये उत्पन्न होणा-या प्रवृत्तीची अशक्यता नष्ट होत नाही. कारण जरी प्रस्तुत दृष्टांतांतील पंगु मनुष्या मध्ये चालण्याची शक्ति नाहीं; तथापि रस्ता पाहून त्या संबंधाने उपदेश करणे, वगैरे हजारो शक्ति त्याच्या मध्ये विद्यमान असतात. आणि त्या प्रमाणेच, अंध मनुष्य देखील चैतन्ययुक्त असून पंगु मनुष्याने केलेला उपदेश त्याला समजल्या मुळेच, त्या उपदेशाला अनुसरून तो मार्गक्रमण करू शकतो. तसेच, अयस्कांता मध्ये देखील लोखंडाच्या जवळ नेला जाणे वगैरे शक्ति विद्यमान असतात. परंतु जीवात्मा निष्क्रिय असल्या मुळे त्याच्या मध्ये अशा प्रकारचे विकार उत्पन्न होणे अगदी संभवत नाहीं. आणि जर जीवात्म्याच्या केवळ सांनिध्याने प्रधान जग उत्पन्न करण्याला प्रवृत्त होते असे मानले,तर जीवात्मा प्रधानाच्या निरंतर संनिध असल्या मुळे असे मानावे लागेल की, जगाचा उत्पत्तिकाळच निरंतर असतो व जीवात्मा कधीच मुक्त होत नाही. उलट