पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ | वैदिक तत्त्वमीमांसा चैतन्यरूप शक्ती कडून नियमन केले गेल्या शिवाय कोणत्याही चैतन्यरहित वस्तू कडून कोणतेही कार्य उत्पन्न केले जाणे शक्य नाहीं, हा सिद्धांत जर वरील विवेचना वरून सांख्यांना कबूल झाला; तर आतां ते कदाचित् असे प्रतिपादन करितीलः-अथ उच्येत । यद्यपि चैतन्यमात्र-वपुः पुरुषः निष्क्रियः प्रधानं अपि दृश्-शक्ति-विकलं, तथापि पुरुष-संनिधानात् अचेतनं प्रधानं प्रवर्तते, तथा दर्शनात् ।। गमन-शक्ति-विकल-दृश्-शक्ति-युक्त-पंगु-संनिधानात् , तत्-चैतन्य-उपकृतः दृश्–शक्ति–विकलः प्रवृत्ति-शक्तियुक्तः अन्धः प्रवर्तते । अयस्कान्त-अश्म-संनिधानात् च अयः प्रवर्तते । एवं प्रकृति-पुरुष-संयोग-कृतः जगत्सर्गः प्रवर्तते ।। ( श्रीभाष्य, २।२।५ ) ह्मणजे, ' या संबंधाने सांख्य असे ह्मणतील कीं, जरी पुरुष किंवा जीवात्मा केवळ चैतन्यरूप असून क्रियारहित आहे; आणि प्रधान हैं चैतन्यरहित आहे; तथापि चैतन्यरूप जो जीवात्मा त्याच्या केवळ सांनिध्याने चैतन्यरहित प्रधाना मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होऊ शकेल. ह्मणजे ज्या प्रमाणे चालण्याची शक्ति नष्ट झाली असून ज्याची पाहण्याची शक्ति शाबूद आहे, असा पंगु मनुष्य संनिध असला तर त्याच्या दृष्टीच्या साहाय्याने, ज्याची पाहण्याची शक्ति नष्ट झाली असून चालण्याची शक्ति शाबूद आहे असा आंधळा मनुष्य चालू शकता; किंवा अयस्कांत संनिध असला तर त्या मुळे लोखंडा मध्य हालचाल उत्पन्न होते; त्या प्रमाणेच जीवात्मा आणि प्रधान यांच्या संयोगाने जगाची उत्पात सुरू होते.'