पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३५७ “प्रधानवादी असे प्रतिपादन करतात कीं, सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांचे परस्परांहून कमी अधिक प्रमाण झालें ह्मणजे त्याच्या योगाने त्यांच्या मध्ये,-एक इतरां संबंधाने मुख्य किंवा गौण,–असा संबंध उत्पन्न होऊन जगाच्या उत्पत्तीला आरंभ होतो. आणि ज्या अर्थी ते असे देखील प्रतिपादन करितात कीं, प्रळयकाळी ( ह्मणजे उत्पत्तिकाळाला आरंभ होण्या पूर्वी ) त्या तिन्ही गुणांची साम्य अवस्था असते; त्या अर्थी असे सिद्ध होते की, त्यांच्या मध्ये परस्परांहून अधिक किंवा कमी असे प्रमाण आणि मुख्य किंवा गौण असा संबंध उत्पन्न होण्याला कांहीं कारण विद्यमान नसल्या मुळे, जगाच्या उत्पत्तीला आरंभ होणे शक्य नाही. आणि जर ते असे ह्मणतील कीं, त्या गुणां मध्ये नेहमीच वैषम्यभाव असतो, तर त्यांच्या मताने जगाच्या प्रळयकाळाची उपपत्ति ठरवितां येत नाही. या वरून देखील प्रधान स्वतंत्रपणे जगाचे कारण नव्हे असेच सिद्ध होते.' आणि सांख्यांनीं योजिलेल्या ज्या विचारसरणीचे येथ पर्यंत निरसन केले आहे, त्या पेक्षां भिन्न विचारसरणीने प्रधानविषयक अनुमान सिद्ध करण्याचा जरी त्यांनी प्रयत्न केला; तरी प्रधान चैतन्यरहित असल्या मुळे ते स्वतंत्रपणे जगाच्या उत्पत्तीचे कारण असणे शक्य नाही, असे जे आह्मी सांख्यांच्या मता विरुद्ध पूर्वी प्रतिपादन केले आहे, तें कायम राहतेचः–दूषित–प्रकार-अतिरिक्त–प्रकार–अन्तरेण प्रधान-अनुमितौ च प्रधानस्य ज्ञातृत्व-शक्ति-वियोगात् ते एव दोषाः प्रादुःव्युः ॥ ( श्रीभाष्य, २२।७)