पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्वमीमांसा २५६ गवत वगैरे वस्तूंचे चैतन्यरूप शक्ती. कडून नियमन केले गेल्या शिवाय त्यांचे कार्यो मध्ये रूपांतर होत नाहीं; त्या अर्थी त्यांनी आपले अनुमान स्थापन करण्याला दिलेला दृष्टांत निराधार ठरतो. कारण असे अन्यत्र घडून येत नाहीं. जर असे सिद्ध करून दाखविता येईल की, गवत वगैरे वस्तु बैल वगैरे जनावरांनी खाल्ल्या, किंवा कोणीच खाल्ल्या नाहीत, तरी देखील त्यांचे दुध वगैरे काय मध्ये रूपांतर होते; तर मात्र असे मानितां येईल की, चैतन्यरूप शक्ती कडून नियमन केले गेल्या शिवाय त्यांचे दुध वगैरे काय मध्ये रूपांतर होते. परंतु तसे सिद्ध करून दाखवितां येत नाही. या करितां .असेच मानले पाहिजे की, गाई वगैरे जनावरांनी खाल्लेल्या. ज्या. गवत वगैरे वस्तु, त्यांचे चैतन्यरूप शक्तीच्या व्यापारा मुळेच दुध वगैरे कार्यों मध्ये रूपांतर होते.' - प्रधानवादा विरुद्ध रामानुजाचार्यांनी आणखी असा एक आक्षेप घेतला आहे की, जगाचा प्रळयकाळ संपून उत्पत्तिकाळाला आरंभ होणे, किंवा उत्पत्तिकाळ संपून प्रळयकाळाला आरंभ होणे, या गोष्टींची सांख्यमताने उपपत्ति ठरवितां येत नाहीं:-गुणानां उत्कर्ष-निकर्ष-निबन्धन–अंगअंगी-भावात् हि जगत्-प्रवृत्तिः....भवद्भिः अभ्युपगम्यते । प्रतिसर्ग अवस्थायां तु साम्य-अवस्थानां सत्त्व-रजः–तमसा अन्योन्य-आधिक्य-न्यूनत्व-अभावात् अंग-अंगि-भावअनुपपत्तेः न जगत्-सर्गः उपपद्यते । तथापि वैषम्य-अ- भ्युपगमे नित्य-सर्ग-प्रसंगः । अतः च न प्राज्ञ-अनधिष्ठितं प्रधानं कारणम् ॥ ( श्रीभाष्य, २।२।६) संज: