पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ वैदिक तत्त्वमीमांसा कैलें जाणे शक्य नाहीं; असें जें वर प्रतिपादन केले आहे, ते बरोबर नाहीं. कारण दुधाच्या किंवा उदकाच्या प्रवृत्ती प्रमाणे प्रधानाची प्रवृत्ति उत्पन्न होऊ शकेल. आपण असे पाहतों कीं, दुधाचे दह्यां मध्ये रूपांतर होते तेव्हां, आरंभी होणा-या हालचाली पासून शेवटी दहीं उत्पन्न होई पर्यंत, जे दुधाचे विकार होतात ते सर्व स्वतंत्रपणे, ह्मणजे दुसन्या कोणत्याही शक्ती कडून दुधाचे नियमन केले गेल्या शिवाय, एका मागून एक उत्पन्न होतात. तसेच ढगांतून पडणारे जे पावसाचे पाणी ते स्वभावतः एकरूप असते; तथापि त्याचे निरनिराळ्या वृक्षांच्या निरनिराळ्या अनेक रसां मध्ये स्वतंत्रपणे रूपांतर होते. त्या प्रमाणेच, रूपांतर होणे हा ज्याचा स्वभावच आहे असें जें प्रधान, त्याचे दुसन्या कोणत्याही शक्ती कडून नियमन केले गेले नाहीं तरी, त्याने जगाच्या प्रळय-अवस्थे मध्ये एकरूप राहवे, व पुढे जगाच्या उत्पत्तीच्या वेळीं सत्त्व वगैरे गुणांची परस्पर विषमता उत्पन्न होऊन, त्या मुळे त्याचे (ह्मणजे प्रधानाचे ) विचित्र जगा मध्ये रूपांतर व्हावे यांत कांहीं अशक्य नाहीं.' परंतु प्रधानवादीचे हे ह्मणणे रामानुजाचार्यांना कबूल नाहीं:- यत् तु क्षीर-जलादि-दृष्टान्ततया निदर्शितं, तत्र अपि प्राज्ञ-अनधिष्ठाने प्रवृत्तिः न उपपद्यते, तत् अपि पूर्व एव पक्षीकृतम्....॥ (श्रीभाष्य, २।२।२ ) ह्मणज; * दुध, उदक, इत्यादि दृष्टांत देऊन जे सांख्यांनी प्रतिपादन केले आहे ते सयुक्तिक नाही. कारण चैतन्यरूप अशा का णत्या तरी शक्ती कड़न नियमन केले गेलें तरच ज्या चैतन्य ||