पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| २५३ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य निर्माण करितां येत नाहीत. सारांश, ज्या अर्थी आपला अनुभव असाच आहे कीं, लाकूड वगैरे ज्या चैतन्यरहित वस्तु त्यांचे, जिला त्यांचा स्वभाव माहीत आहे अशा, चैतन्यरूप शक्ती कडून नियमन केले गेले नाही, तर त्या कोणतेही कार्य उत्पन्न करू शकत नाहींत; आणि जिला त्यांचा स्वभाव माहीत आहे अशा चैतन्यरूप शक्ती कडून त्यांचे नियमन केले गेले, तरच त्यांच्या कडून कार्य उत्पन्न केले जाते; त्या अर्थी ज्याचे कोणत्याही चैतन्यरूप शक्ती कडून नियमन केले जात नाहीं असें जें प्रधान, त्याच्या कडून कोणतेही कार्य उत्पन्न केले जाणे शक्य नाहीं.' | या संबंधाने प्रधानवादी कदाचित् असें ह्मणेल कीं:- यत् उक्तं प्रधानस्य प्राज्ञ-अनधिष्ठितस्य विचित्र-जगत्रचना-अनुपपत्तिः इति । तत् न । यतः पयः-अंबुवत् प्रवृत्तिः उपपद्यते । पयसः तावत् दधि-भावेन परिणममानस्य अनन्य–अपेक्षस्य आद्य-परिस्पन्दन-प्रभात-परिणाम-परंपरा स्वतः एव उपपद्यते । यथा च वारिद-विमुक्तस्य अंबुनः एकरसस्य नालिकेर-ताल-चूत-कपित्थ-निंबतिन्तिण्यादि-विचित्र-रस-रूपेण परिणाम-प्रवृत्तिः स्वतः एव दृश्यते । तथा प्रधानस्य अपि परिणाम-स्वभावस्य अन्यअनाधिष्ठितस्य एवं प्रतिसर्ग–अवस्थायां सदृश-परिणामेन अवस्थितस्य सर्ग–अवस्थायां गुण-वैषम्य-निमित्त-विचित्रेपरिणामः उपपद्यते ॥ ( श्रीभाष्य, २।२।२ ) ह्मणजे, ६ ज्या अर्थी चैतन्यरूप अशा कोणत्याही शक्ती कडून प्रधानाचे नियमन केले जात नाही, त्या अर्थी ज्याची रचना विचित्र आहे असे हे जग त्याच्या कडून निर्माण