पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | २४९ - येथे पर्यंत शंकराचीन प्रधानवादा विरुद्ध असे प्रतिपादन केले आहे कीं, ( १ ) जें मनुष्याच्या पुरुषाथला सांधनीभूत असून, ज्याची रचना विलक्षण आणि अत्यंत चतुर कारागिरांना देखील अकल्पनीय आहे, असे हे जग चैतन्यरहित प्रधाना कडून निर्माण केले जाणे शक्य नाहीं; इतकेच नव्हे, तर (२) प्रधान चैतन्यरहित असल्या मुळे त्याचे कोणत्या तरी चैतन्यरूप शक्ती कडून नियमन केले गेल्या शिवाय, कोणतेच कार्य उत्पन्न करण्या संबंधानें त्याची प्रवृत्त होणे शक्य नाहीं, किंबहुना त्याच्या मध्यें कोणतीच प्रवृाते किंवा हालचाल उत्पन्न होणे शक्य नाहीं; आणि (३ ) प्रधाना मध्ये ही प्रवृत्ति उत्पन्न होण्या संबंधाने पुरुष किंवा जीवात्मा यांच्या कडून त्याचे नियमन केले जाणे शक्य नाहीं. सारांश, जर जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी प्रधान व पुरुष यांच्या शिवाय सर्वज्ञ आणि सर्वशाक्त असे चैतन्यस्वरूप तत्त्व विद्यमान नसते, तर सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांची प्रधानरूप साम्यावस्था नष्ट होऊन जगाच्या उत्पत्तीला आरंभ होणे कधीही शक्य झाले नसते. या अर्थीच शंकराचार्यांनी ह्मटले आहे कीं:-इतः च न प्रधानस्य प्रवृत्तिः अवकल्पते । यत् हि सत्त्व-रजः--तमसी अन्योन्य- गुण प्रधान-भावं उत्सृज्य, सोम्येन स्वरूपमात्रेण अवस्थानं सां प्रधान-अवस्था । तस्यां अवस्थायां अनपेक्ष (१) प्रधानस्य स्वाभाविकी पुरुष-संनिधेः वा न प्रवृत्तिः इति उक्तम् । इदानीं कस्यचित् गुणस्य प्राधान्यं कस्यचित् उपसर्जनत्वं इत्यपि वैषम्यं अभ्युपगतं स्वतः परतः वा न संभवति इति अह ॥ ( आनंदागर )