पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ वैदिक तत्त्वमीमांसा त्याला प्रधाना मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करून तिचे नियमन करितां येईल, असा कोणताच व्यापार त्याच्या कडून केला जाणे शक्य नाहीं. असे देखील ह्मणतां येणार नाहीं कीं, ज्या प्रमाणे लोखंडाच्या केवळ संनिध राहण्यानेच अयस्कांत मणी लोखंडा मध्ये गति उत्पन्न करितो, त्या प्रमाणेच प्रधानाच्या केवळ संनिध राहण्याने पुरुष किंवा जीवात्मा प्रधाना मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करितो. कारण जर तसे मानिले तर असे देखील मानावे लागेल की, पुरुष निरंतर प्रधानाच्या संनिध असल्या मुळे तो प्रधाना मध्ये निरंतर प्रवृत्ति उत्पन्न करितो. ( परंतु तसे होत नाहीं. ) हा आक्षेप अयस्कांताला लागत नाही. कारण अयस्कांत निरंतर लोखंडाच्या संनिध अंसत नाहीं, केव्हां केव्हां अंसतो. इतकेच नव्हे, तर जेव्हां तो लोखंडाच्या संनिध असतो, तेव्हां तो सरळ दिशे मध्ये असला तरच त्याच्या मुळे लोखेडा मध्ये हालचाल उत्पन्न होते. या वरून असे स्पष्ट होते कीं, प्रधानवादाचे समर्थन करण्या संबंधाने वरील दोहों पैकीं एकाही दृष्टांताचा उपयोग होणे शक्य नाही. कारण प्रधान चैतन्यरहित व पुरुष उदासीन असून त्यांच्या मध्ये संबंध उत्पन्न करण्याला तिसरी कोणतीही शक्तिं (सांख्यांच्या मते ) विद्यमान नसल्या मुळे, त्यांच्या मध्ये संबंध उत्पन्न होणे शक्य नाहीं. आणि जर प्रधानबादी असे ह्मणतील कीं, प्रधान ही दृश्य वस्तु व पुरुष हा द्रष्टा असल्या मुळे, प्रधान व पुरुष परस्परांशी स्वभावतःच संबद्ध आहेत, तर त्यांच्या मधील हा संबंध कधीच नष्ट होणार नाहीं; व त्या मुळे पुरुषाला मुक्ति प्राप्त होणे अशक्य होईल,