पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । २४५ चैतन्यरूप वस्तू कडून नियमन केले गेल्या शिवाय किंवा चैतन्यरूप वस्तूच्या साहाय्या शिवाय कोणत्याही चैतन्यरहित वस्तू मध्ये कोणतीही प्रवृत्ति उत्पन्न होणे शक्य नाही, असे कबूल केलें; ह्मणजे मग (शंकराचार्यांच्या मते) प्रधानवादाच्या योगाने जगाच्या उत्पत्तीची उपपत्ति ठरवितां येणे शक्य नाहीं. कारणः-सांख्यानां त्रयः गुणाः साम्येन अवतिष्ठमानाः प्रधानम् । न तु तत्-व्यतिरेकेण प्रधानस्य प्रवर्तकं निवर्तकंवा किंचित् बाह्यं अपेक्ष्यं अवस्थितं अस्ति ।.... इत्यतः अनपेक्षं प्रधानम् । अनपेक्षत्वात् च कदाचित् प्रधानं महत्-आदि-आकारेण परिणमते, कदाचित् न परिणमते, इति एतत् अयुक्तम् ।। ( शारीरकभाष्य, २।२।४ ) ह्मणजे, * सांख्यांच्या मते जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी प्रधान नामक जी सत्त्वगुण रजोगुण व तमोगुण यांची साम्य-अवस्था ती मात्र विद्यमान असते. एतद्रूप जें प्रधान त्याच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होण्या संबंधाने किंवा त्याला प्रवृत्ती पासून निवृत्त करण्या संबंधाने जी त्याचे नियमन करील, अशी त्याच्याहून भिन्न कोणतीच शक्ति विद्यमान असत नाहीं. सारांश, सांख्यांच्या मता प्रमाणे प्रधान अत्यंत स्वतंत्र आहे असे कबूल करावे लागते. आणि ज्या अर्थी ते अचेतन असून अत्यंत स्वतंत्र आहे, त्या अर्थी ते केव्हां केव्हां महत् वगैरे विकार उत्पन्न करिते, केव्हां केव्हां करीत नाहीं, या गोष्टीची उपपत्ति सांख्यांच्या मताने लागत नाहीं.' इतकें सिद्ध झाल्या नंतर देखील जर चैतन्यरूप ईश्वराचे अस्तित्व कबूल करण्याला प्रधानवादी तयार झाले नाहीत, तर त्यांना शेवटीं असें ह्मणावे लागेलः- स्यात् एतत् ।