पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १९ कसै असू शकेल ? ही शंका पुढे आल्याबरोबर प्रथम असे वाटते की, ती दूर करण्याकरितां एकतर ज्या (श्रुति ) ग्रंथांमध्ये, प्रत्यक्षादि प्रमाणांच्या विषयांसंबंधानेच का होईनात तरी पण, असत्य विचार आहेत ते ग्रंथ ईश्वरप्रणीत किंवा अदृष्ट विषयांसंबंधाने देखील प्रमाणभूत नव्हत, असे कबूल केले पाहिजे; किंवा प्रत्यक्षादि प्रमाणांच्या विषयांसंबंधानें श्रुतिग्रंथांत जी वचने आहेत ती देखील प्रमाणभूत मानिली पाहिजेत अशा रीतीनें कीं, जरी त्यांतील विचार प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें प्राप्त होणा-या जगविषयक ज्ञानाच्या विरुद्ध असले, तरी ते विचारच सत्य, आणि त्या विचारांच्या विरुद्ध असे जे प्रत्यक्षाादै प्रमाणांच्या योगानें प्राप्त होणारे ज्ञान ते असत्य. परंतु शंकराचार्यांना हे दोन्ही विकल्प कबूल नाहीत. त्यांच्या मते ही गोष्ट अत्यंत निःसंशय आहे की, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत असून ते अदृष्ट विषयांसंबंधाने सर्वथैव प्रमाणभूत आहेत. कारण अदृष्ट विषयांसंबधींचे ज्ञान श्रुतिग्रंथांशिवाय दुसन्या कोणत्याही साधनाने प्राप्त होणे शक्य नाहीं. आणि ह्मणून अशा विषयांसंबंधाने श्रुतिग्रंथांत अमुक विचार आहेत असे निश्चित झाले, ह्मणजे त्या विचारांचे अंतिम सत्य ठरले. अर्थातच, हे विचार प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें प्राप्त होणा-या ज्ञानाच्या विरुद्ध आहेत किंवा अविरुद्ध आहेत, असा विचार करणे अप्रासंगिक होय. तर आता