पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ वैदिक तत्त्वमीमांसा जर सिद्ध झाले; तर मग गवत वगैरे वस्तू प्रमाणे प्रधानाचे देखील स्वभावतःच रूपांतर होते असे आह्मी कबूल करूं. परंतु तसे सिद्ध होत नाही. कारण ज्या अर्थी गाईनेच खाल्लेल्या ज्या गवत वगैरे वस्तु त्यांचे मात्र दुध मध्ये रूपांतर होते, ज्या गाईने खाल्ल्या नाहीत किंवा बैलाने खाल्ल्या, त्या वस्तूंचे दुधा मध्ये रूपांतर होत नाहीं; त्या अर्थी असेच मानिले पाहिजे की, गवत वगैरे चैतन्यरहित वस्तूंचे दुध वगैरे वस्तू मध्ये जे रूपांतर होते, ते ( चैतन्यरूप ) दु: सच्या कोषात्या तरी कारणाच्या व्यापारा मुळे होते. जर असे नसते, तर गाईच्या शरीराहून भिन्न अशा दुसन्या ठिकाणी देखील गवताचे दुध झाले असते. मनुष्याला पाहिजे तेव्हां किंवा पाहिजे तितकें दुध मिळविता येत नाही ही गोष्ट जरी खरी; तथापि तिच्या वरून असे सिद्ध होत नाहीं कीं, गवताचे दुधा मध्ये रूपांतर होण्याला दुसन्या कोणत्याही कारणाचे साहाय्य लागत नाही. कारण, एकतर, कांहीं वस्तु अशा आहेत की, त्या मनुष्याच्या प्रयत्नाने उत्पन्न होतात; दुस-या कांहीं वस्तु अशा आहेत की, त्या मनुष्याला दैवी सामर्यानेच प्राप्त होऊ शकतात. दुसरे असे की, प्रस्तुत उदाहरणांतील वस्तू संबंधानें गवत वगैरे घेऊन योग्य उपाय केला असतां मनुष्य दुध मिळवू शकतो. कारण ज्यांना पुष्कळ दुध पाहिजे असेल ते गाईला पुष्कळ गवत चारितात; व त्या मुळे त्यांना पुष्कळ दुध मिळते. या करितां गवत वगैरे वस्तू प्रमाणे प्रधानाचे देखील स्वभावतःच महत् वगैर कार्या मध्ये रूपांतर होणे शक्य आहे, असे जें प्रधानवादी प्रतिपादन करितात ते सयुक्तिक नव्हे.'