पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २४३ मानुष-संपाद्यं, किंचित् दैव-संपाद्यम् । मनुष्याः अपि शक्नुवन्ति एव उचिंतेन उपायेन तृणादि उपादाय क्षीरं संपादयितुम् । प्रभूतं हि क्षीरं कामयमानाः प्रभूतं घास धेनुं चारयन्ति । ततः च प्रभूतं क्षीरं लभन्ते । तस्मात् न तृणादिवत् स्वाभाविकः प्रधानस्य परिणामः ॥ (शारिरकभाष्य, २।२।५) झणजे, ही गोष्ट कबूल करून प्रधानचादी कदाचित् असे ह्मणतील की, ज्या प्रमाणे गवत, पाने, उदक, वगैरे चैतन्यरहित वस्तु, दुसन्या कोणत्याही कारण। शिवाय केवळ स्वत:च्याच स्वभावाने, दुध वगैरे वस्तू मध्ये रूपांतर पावतात; त्या प्रमाणेच प्रधानाचे महत् वगैरे काय मध्ये स्वभावतःच रूपांतर होते. गवत वगैरे वस्तूंचे दुध वगैरे वस्तू मध्ये रूपांतर होते ते दुस-या कोणत्याही कारणा शिवाय होते, असें ह्मणण्याला काय आधार आहे,असे जर कोणी विचारील तर त्याला प्रधानवादीचे उत्तर असे की, गवत वगैरे वस्तूंचे दुसन्या कोणत्या तरी कारणाच्या योगाने रूपांतर होते, असा आपला अनुभव नाहीं. कारण जर तसा आपला अनुभव असता तर, आपणांला पाहिजे तेव्हा गवत वगैरे वस्तु घेऊन, त्या कारणाच्या योगाने त्यांच्या पासून आपण दुध वगैरे वस्तु मिळविल्या. असत्या. परंतु आपण तसे करीत नाही. या वरून असे सिद्ध होते की, गवत वगैरे वस्तूंचे दुध वगैरे वस्तू मध्ये स्वभावतःच रूपांतर होते. आणि हीच गोष्ट प्रधाना ला लागू पडते. या संबंधाने शंकराचार्यांचे ह्मणणे असे की, गवत वगैरे वस्तूंचे दुध वगैरे वस्तू मध्ये स्वभावतःच रूपांतर होते असे