पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य . ३४१ चैतन्यरहित वस्तु, त्यांच्या मध्ये ज्या अर्थी स्वतंत्रपणे प्रवृत्ति उत्पन्न होत नाही, त्या अर्थी असेच अनुमान केले पाहिजे कीं, दुध व उदक यांच्या मध्ये जी प्रवृत्ति उत्पन्न होते ती, चैतन्यरूप शक्ती कडून त्यांचे नियमन केले जाते, ह्मणूनच उत्पन्न होते. आणि असे अनुमान करण्याला श्रुतीचा आधार आहे. कारण, जो उदका मध्ये वास करून उदकाचे आंतून नियमन करतो, 4 पर ब्रह्मा कडून केल्या जाणा-या नियमनाला अनुसरून दुस-या नद्या पश्चिमे कडे वाहतात,-इत्यादि श्रुतिवचने असे शिकवितात कीं, या जगा मध्ये जी जी कांहीं हालचाल होते, ती सर्व ईश्वरा कडून केले जाणारे जे सर्व जगाचे नियमन त्याच्या मुळे होते. या करितां ज्या अर्थी दुध आणि उदक यांच्या मधील प्रवृत्ती संबंधाने आमचा सिद्धांत लागू पडतो; त्या अर्थी त्या सिद्धांताची असत्यता, किंवा प्रधानवादीच्या सिद्धांताची सत्यता, ठरविण्या करितां त्या प्रवृत्तीचा कांहीं उपयोग होणे शक्य नाहीं. दुसरे असे की, धेनु चैतन्ययुक्त असल्या मुळे ती वत्सविषयक प्रेमाच्या व इच्छेच्या योगाने आपल्या दुधा मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करिते असे ( आमच्या बाजूने ) ह्मणतां येईल. तसेच, चैतन्ययुक्त जें वत्स ते शोषणाने दुधा मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करिते. उदका मध्ये जी प्रवृत्त उत्पन्न होते, ती देखील अत्यंत स्वतंत्रपणे उत्पन्न होत नाहीं. कारण ती प्रवृत्ति उत्पन्न होण्याला जमीन उतरती असणे वगैरे गोष्टींची आवश्यकता लागते. आणि कोणतीही प्रवृत्ति झाली तरी ती चैतन्यरूप शक्ती मुळे उत्पन्न होते, असे