पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३३५ मृत्तिका रथं इत्यादि ज्या स्वभावतः चैतन्यरहित वस्तु, त्यांचे चैतन्ययुक्त असे जे कुंभकार अश्व वगैरे, त्यांच्या कडून नियमन केले गेल्या शिवाय त्या वस्तू मध्ये कोणतेही विशिष्ट कार्य उत्पन्न केले जाण्याला योग्य अशी प्रवृत्ति उत्पन्न होत नाहीं. आणि ज्या अर्थी आपल्या अनुभवाला येणा-या गोष्टींच्या आधारानेच अनुभवाला न येणान्या गोष्टीं संबंधाने आपण अनुमान केले पाहिजे, त्या अर्थी असे अनुमान करितां येत नाहीं कीं, जगाचे कारण चैतन्यरहित आहे. कारण जर जगाचे कारण चैतन्यरहित असते तर जगरूप कार्य उत्पन्न केले जाण्याला आवश्यक लागणारी जी प्रवृत्ति, ती प्रवृत्तिच त्या कारणा मध्ये उत्पन्न झाली नसती. - या विवेचना संबंधाने प्रधानवादी सांख्यांचा एक आक्षेप कल्पून त्या आक्षेपाचे शंकराचार्यांनीं निराकरण केले आहे. ते असे:-ननु चेतनस्य अपि प्रवृत्तिः केवलस्य न दृष्टा । सत्यं एतत् । तथापि चेतन-संयुक्तस्य रथादेः अचेतनस्य प्रवृत्तिः दृष्टौ । न तु अचेतन-संयुक्तस्य चेतनस्य प्रवृत्तिः ( १ ) अचेतनस्य प्रवृत्तिं प्रतिषेधता केवल-चेतनस्य वा तस्य एव अचेतन-संयुक्तस्य वा प्रवृत्तिः विवक्षिता, इति विकल्प्य आद्य दूषयन् आशंकते–'न नु' इति ॥ ( आनंदगिरि ) । | ( २ ) केवलस्य चेतनस्य प्रवृत्तिः अदृष्टा इति एतत् अंगीकरोति- सत्यं ' इति ॥ ( आनंदगिरि ) । ( ३ ) केवलस्य चेतनस्य अप्रवृत्तौ अपि चेतन-अचेतनयोः मिथः संबन्धात् सृष्टि-प्रवृत्तिः इति भावः ॥ ( गोविंदानंद ) (४) सर्वा प्रवृत्तिः अचेतन-आश्रया एव दृष्टा । न तु अचेतन-संवन्धेन अपि चेतनस्य क्वचित् प्रवृत्तिः दृष्टा । तस्मात् न चेतनात् सृष्टिः इयर्थः ॥ ( गोविंदानंद )