पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ वैदिक तत्त्वमीमांसा त्यांचे विवेचन करणे हा श्रुतिग्रंथांचा उद्देश नव्हेः–ने हि अयं सृष्टयादि-प्रपंचः प्रतिपिपादयिषितः ॥ (शारीरकभाष्य, १।४।१४. ) आणि ह्मणून प्रत्यक्षादि प्रमाणांनीं न समजण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या संबंधानेंच श्रुतींचे प्रामाण्य, प्रत्यक्षादि प्रमाणांनी ज्या गोष्टी समजतात त्यांच्या संबंधाने श्रुति प्रमाणभूत नव्हे. कारण ज्या गोष्टी अन्य तव्हेनें समजण्यासारख्या आहेत किंवा समजलेल्या आहेत, त्या समजून देण्यःला श्रुतीच्या प्रामाण्याची आवश्यकता नाहीं:- प्रत्यक्षादि-प्रमाण-अनुपलब्धे हि विषये....श्रुतेः प्रामाण्यं न प्रत्यक्षादि-विषये, अदृष्ट-दर्शन-अर्थत्वात् प्रामाण्यस्य ॥ ( गीताभाष्य, १८१६६.) इतकेच नव्हे, तर प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें जी गोष्ट समजते,—उदाहरणार्थ अग्नि उष्ण व प्रकाश मान आहे, तिच्या विरुद्ध जरी शेकडो श्रुतिवचनें असलीं कीं, अग्नि थंड किंवा प्रकाशरहित आहे, तरी तीं श्रुतिवचनें खरीं मानितां येणार नाहींतः-न हि श्रुतिशतं अपि शीतः अग्निः अप्रकाशः वा इति ब्रुवत् प्रामाण्यं उपैति ॥ ( गीताभाष्य, १८।६६.) परंतु याठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो की, श्रुतिग्रंथ जर ईश्वरप्रणीत आहेत, तर मग त्यांच्या मध्ये प्रत्य-. क्षादि प्रमाणांच्या विषयासंबंधाने तरी असत्य वचन • (१) अज्ञात-अर्थ-ज्ञापर्क प्रमाणे इति स्थितेः न ज्ञाते श्रुतिप्रामाण्यं इति आइ- अदृष्ट' इति ॥ ( आनंदगिरि )