पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३३३ मुळे, त्या अनेक द्रव्यांच्या संयोगाच्याच योगानें उत्पन्न हातात असे मानले पाहिजे. परंतु जर ही गोष्ट सांख्यांना कबूल आहे, तर त्यांनी असे देखील कबूल केले पाहिजे कीं, सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण यां पैकी प्रत्येक द्रव्य समर्याद असल्या मुळे ते अनेक द्रव्यांच्या संयोगाने उत्पन्न होते. शेवटी, सांख्य जें असें ह्मणतात की, जग चैतन्यरहित असल्या मुळे त्याचे कारण देखील तसेच (ह्मणजे चैतन्यरहितच) असले पाहिजे, ते बरोबर नाहीं. कारण पलंग आसने इत्यादि चैतन्यरहित वस्तूचे कारण चैतन्ययुक्त असते, असे आपण नेहमी पाहतों.' | शंकराचार्यांनी वरील विवेचनांत असे प्रतिपादन केलें आहे की, जगाची जी विलक्षण रचना व उपयुक्तता ती प्रधान किंवा दुसरे कोणतेही चैतन्यरहित कारण स्वतंत्रपणें उत्पन्न करू शकणार नाहीं. पुनः त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, प्रधान किंवा दुसरी कोणतीही जी चैतन्यरहित वस्तु तिचे कोणत्या तरी चैतन्ययुक्त शक्ती कडून नियमन केले गेल्या शिवाय तिच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होणेच शक्य नाहीं,-ह्मणजे अशा वस्तुरूप कारणा कडून कोणतेच कार्य स्वतंत्रपणे उत्पन्न केले जाणे शक्य नाहीं. ते ह्मणतातः-आस्तां तावत् इयं रचना । तत्-सिद्धिअथ या प्रवृत्तिः साम्य-अवस्थानात् प्रच्युतिः, सत्त्व-रजःतमसां अंग-अंग-भावरूप-आपत्तिः विशिष्ट-कार्य-अभि ( १ ) न हि साम्य-अवस्थायां प्रधानस्य विचित्र-विकार-र, चना-अभिमुख्येने प्रवृत्तिः अवकल्पते, तथा च गुण-वैषम्य-आ पत्तेः भवति रचना-अर्था इति आस्थेयं इत्यर्थः ॥ ( आनंदगिरि )