पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३२ वैदिक तत्त्वमीमांसा बाह्यस्थ कुंभकार मृत्तिकेचे नियमन करितो त्या प्रमाणे प्रधानाचे नियमन करणारा जो बाह्यस्थ चैतन्ययुक्त कर्ता तो जगाचे कारण नव्हे. कारण असा भेद करण्याला कांहीं सयुक्तिक आधार नाही. आणि असा भेद न केल्या मुळे कोणताही विरोध उत्पन्न होत नाहीं; इतकेच नव्हे, तर असा भेद न करणें हें श्रुतीला संमत आहे. कारण जगाचे कारण चैतन्ययुक्त आहे असे श्रुति स्पष्टपणे प्रतिपादन करिते. या वरून असे सिद्ध होते की, जगाच्या रचनेची उपपत्ति ठरविणे अशक्य होते या करितां जगाचे कारण चैतन्यरहित आहे असे अनुमान करितां नये. दुसरे असे की, जगाचीं जीं बाह्य व आध्यात्मिक अंगें तीं दोन्ही सुखदुःखमोहस्वरूप आहेत, असे जें सांख्य ह्मणतात ते बरोबर नाही. कारण सुख दुःख व मोह हे मनोधर्म आहेत; व शब्द रूप रस इत्यादि ज्या बाह्य जगांतील वस्तु त्यांच्या मध्ये सुख दुःख मोह हे धर्म आहेत असा अनुभव येत नाहीं; मात्र त्या वस्तु हे मानसिक धर्म उत्पन्न होण्याला कारणीभूत होतात असे आपण पाहतों. आणि जरी शब्द रूप रस वगैरे बाह्य वस्तू पैकी प्रत्येक वस्तु एकरूपच असते, तरी तिच्या योगानें उत्पन्न होणा-या ज्या मनोवृत्ति त्या निरनिराळ्या प्राण्यांच्या वासनां वर अवलंबून असल्या मुळे, त्या सुखरूप दुःखरूप किंवा मोहरूप अशा असतात. पुनः सांख्य असे प्रतिपादन करतात कीं, मूळ अंकुर इत्यादि भिन्न वस्तु समर्याद असून त्या अनेक द्रव्यांच्या संयोगाच्या योगाने उत्पन्न होतात, असे ज्या अर्थी आपण प्रत्यक्ष पाहतों; त्या अथी बाह्य आणि अंतस्थ जगांतील सर्व वस्तु समर्याद असल्या