पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २३१ कसें ह्मणतां येईल की, ज्याच्या मुळे किंवा ज्याच्या साधनाने अनेक कर्माचे फळ प्राप्त होते, असे जे पृथ्वी वगैरे लोकां सहित बाह्य जग; आणि ज्याच्या मध्ये देवत्व, मनुष्यत्व, पशुत्व, इत्यादि अनेक जाति आहेत, ज्याच्या अवयवांची रचना नियमित आहे, व ज्याच्याशी संयोग झाल्या मुळे अनेक कर्माची फळे उपभोगितां येतात, असे जे प्राण्यांच्या शरीरां सहित आध्यात्मिक जग; एद्रूप बाह्य जग आणि आध्यात्मिक जग यांच्या योगाने बनलेले, अत्यंत कुशळ व अत्यंत चतुर अशा कारागिरांना ज्याच्या विषयी मानसिक कल्पना देखील करितां येणे शक्य नाही, असे जे हे दृश्यमान सर्व जग ते चैतन्यरहित प्रधानाने निर्माण केले ? कारण, पाषाण, मातीचे ढेकूळ, वगैरे व्या चैतन्यरहित वस्तु, त्यांच्या मध्ये अशा प्रकारचे जग उत्पन्न करण्याची शक्ति असते असे आपणांला दिसत नाहीं. विशिष्ट आकाराचे घट वगैरे जी कार्ये चैतन्यरहित अशा मृत्ति केपासून उत्पन्न होतात तीं त्या मृत्तिकेचे कुंभकारा कडून नियमन केले जात असल्या मुळेच उत्पन्न होतात.आणि आपल्या या अनुभवाला अनुसरून आपणांला असे मानावे लागेल की, हे जग प्रधाना पासून उत्पन्न होणे शक्य होण्या करितां त्याचे ( ह्मणजे प्रधानाचे) चैतन्ययुक्त अशा कोणत्या तरी कर्या कडून नियमन केले जात असले पाहिजे. असे देखील ह्मणतां येणार नाहीं कीं, जरी कोणत्या तरी चैतन्ययुक्त कर्या कडून प्रधानाचे नियमन केले जात असल्या मुळे प्रधाना पासून सर्व जग उत्पन्न होते; तथापि मृत्तिके प्रमाणे प्रधाना मध्ये सर्व जगाचे उपादानत्व असल्या मुळे प्रधान मात्र जगाचे मूळ कारण,