पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ वैदिक तत्त्वमीमांसा एवं कारणं, तत् एव हि तत्-उत्पात्त-आख्य-शक्तिप्रकृतिमत् । तथा दर्शनात् अव्यक्तस्य गुण-साम्यरूपस्य देशतः कालतः च अपरिमितस्य एंव कारणत्वं भेदानां महत्अहंकार-तन्मात्रा–आदीनां परिमितत्वात् अवगम्यते । महत्-आदीनि च घटादिवत् परिमितानि कृत्स्न-जगत्-उत्पत्तौ न प्रभवन्ति । अतः त्रिगुणं जगत् गुण-त्रय-साम्यरूपप्रधान-एक-कारणकं इति निश्चीयते ।। (श्रीभाष्य, २।२।१) झणजे, “ सांख्य असे प्रतिपादन करितातं की, सर्व जगाचे मूळ कारण एकच असे कबूल करणे आवश्यक आहे. कारण जगरूप में कार्य ते अनेक कारणां पासून उत्पन्न होते असे जर मानिले, तर जगाच्या कारणा विषयीं अनवस्था उत्पन्न होईल. उदाहरणार्थ, जर अशी कल्पना केली की, वस्त्राचे अवयव जे तंतु, ते आपापल्या सहा बाजूंनीं परपरांशीं संयुक्त होऊन अवयविरूप जे वस्त्र तें उत्पन्न कारतात; तर पुनः अशी कल्पना करावी लागेल की, त्या प्रमाणेच तंतूचे अवयव तंतु उत्पन्न करितात, त्या प्रमाणेच तंतूंच्या अवयवांचे अवयव तंतूचे अवयव उत्पन्न करितात; आणि त्या प्रमाणेच शेवटीं परमाणु आपल्या सहा बानी परस्परांशीं संयुक्त होऊन आपले कार्य उत्पन्न कारतात अशी कल्पना करावी लागेल. कारण एरवी विस्तृत वस्तूच्या उत्पत्ती विषयीं उपपत्ति लावितां येणार नाहीं. इतकेच नव्हे, तर अशी देखील कल्पना लागेल कीं, परमाणुरूप जे अवयवि ते देखील त्या प्रमा आपल्या अवयवांच्या संयोगा पासून उत्पन्न होतात; परसा अवयव या प्रमाणेच आपल्या अवयवांच्या संयोगा पासून (ल त्या प्रमाणेच तात; परमाणूचे