पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | ३१९ (१६) | ( २) वरील विवेचना वरून असे स्पष्ट होते की, शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या मते, अंतर्बाह्य जग विद्यमान असून शरीरादि ज्या जड वस्तु त्यांच्याहून भिन्न व स्वतंत्र असा जीवात्मा देखील विद्यमान आहे. तर आतां वरे निर्दिष्ट केलेल्या तीन प्रश्नां पैकी दुसरा प्रश्न उत्पन्न होतो, तो प्रश्न असा की, जगाचे कारण चित्स्वरूप आहे किंवा चित्स्वरूप आहे ? या प्रश्नाला वैदिक वाङ्मयांत एक असे उत्तर दिलेले आहे कीं, अचित्स्वरूप प्रधान हे जगाचे कारण होय. वैदिक वाङ्मया मध्ये हे मत प्रधानवाद किंवा सांख्यमत या नावाने प्रसिद्ध आहे. रामानुजाचार्यांच्या भाषेने हे मत असे-एषा सांख्यानां दर्शन-स्थितिः । * मूल-प्रकृतिः अविकृति;, महत्-आद्याः प्रकृति-विकृतयः सप्त, षोडशकः च विकारः, न प्रकृतिः न विकृतिः पुरुषः' इति तत्त्वसंग्रहः । मूल-प्रकृतिः नाम सुख-दुःख-मोह-आत्मकाान लाघवे-प्रकाश-चलन–उपष्टंभन–गौरव-आवरण-कार्याणि, अत्यन्त–अतीन्द्रियाणि कार्य-एक-निरूपण-विवेकानि अन्यून-अतिरेकाणि समतां उपेतानि सत्त्व-रजः–तमांसि द्रव्याणि । सा च सत्त्व-रजः–तमसां साम्यरूपा प्रकृतिः एका स्वयं अचेतना अनेक-चेतन-भोग–अपवर्ग-अथ नित्या सर्वगता सततविक्रिया न कस्यचित् विकृतिः, अपि तु परम–कारणं एव । महत्-आद्याः तत्-विकृतयः अन्येषां च प्रकृतयः सप्त । महान् , अहंकारः, शब्द-तन्मात्रं, स्पर्श-तन्मात्रं, रूप (१) पृष्ठ १३३