पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २०५ दृश्य-निबन्धनः अयं एकत्व-व्यामोहः इति वक्तुं शक्यं, व्यामुह्यतः ज्ञातुः एकस्य अनभ्युपगमात् । न हि अन्य-अनुभूतेन एकत्वं सादृश्यं वा स्व-अनुभूतस्य अन्यः अनुसंधत्ते । अतः भिन्न-काल-वस्तु-आश्रय-सा- दृश्य-अनुभव-निबन्धनं एकत्व-व्यामोहं वदाद्भिः ज्ञातुः एकत्वं अवश्य-आश्रयणीयम् । न च ज्ञेयेषु अपि घटादिषु, ज्वालादिषु इव, भेद-साधन-प्रमाणं उपलभामहे, येन सादृश्य-निबन्धनां प्रत्यभिज्ञां कल्पयेम ।..., अतः प्रत्याभज्ञायाः स्थिरत्वं अवगम्यमानं न केन अपि प्रकारेण अपह्रोतुं शक्यम् ॥ ( श्रीभाष्य, २।२।२४ ) ह्मणजे, “ वस्तु स्थिर आहेत,-क्षणिक नाहीत, ही गोष्ट स्मृतीच्या योगाने देखील सिद्ध होते. स्मृति किंवा स्मरण ह्मणजे आपणांला ज्या वस्तूचा पूर्वी अनुभव आला होता, त्या वस्तू विषयीं प्रत्यभिज्ञान किंवा ओळख. “तीच ही' अशा रीतीने भूत काळीं अनुभविलेली प्रत्येक वस्तु आपणांला ओळखितां येते. या संबंधाने सर्वास्तित्ववादी कदाचित् असे ह्मणेल की, ज्या प्रमाणे ज्वाळेच्या संबंधाने भ्रम होतो, त्या प्रमाणेच पूर्व काळीं अनुभविलेली वस्तु वर्तमान काळीं अनुभविली जाणाच्या वस्तु सारखी असल्या मुळे, दोन्ही वस्तु एकच आहेत, असा आपणांला भ्रम होतो. परंतु जर सर्वास्तित्ववादी असें ह्मणेल तर ज्याला भ्रम होतो तो जीवात्मा स्थिर आहे, क्षणिक नव्हे, असे त्याच्या मता विरुद्ध त्याला कबूल करावे लागेल. कारण पूर्वी ज्या वस्तूचा एकाला अनुभव आला, त्या वस्तू सारखी किंवा त्या वस्तूशीं एकरूप अशी वस्तु मी अनुभवीत आहे, असे दुसन्याला