पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ : वैदिक तत्त्वमीमांसा । येत नाही. कारण जर परमाणु व महाभूतें हीं सर्वं क्षणिक आहेत असे मानले पाहिजे, तर क्षणोक्षणीं नष्टे होणारे जे परमाणु व महाभूते त्यांचा,-तीं एकत्र होण्याला आवश्यक असा, व्यापार केव्हा झाला, आणि ती केव्हां एकत्र झाली ? तसेच परमाणु, महाभूते, आणि त्यांच्या योगाने बनलेल्या सर्व वस्तु, या केव्हां जाणिल्या जातात, वे ठाकणे घेणे इत्यादि त्यांच्या संबंधाने व्यवहार केंव्हां केला जातो ? त्या प्रमाणेच, जाणणारा जीवात्मा ह्मणजे कोण व कोणत्या पदार्थाशीं त्याच्या इंद्रियांचा संनिकर्ष होतो ? तसेच, कोणता जीवात्मा कोणता पदार्थ केव्हां जाणितो, च कोणता जाणिलेला पदार्थ कोण केव्हां घेतो ? कारण ज्या क्षणीं ज्या जीवाम्याच्या इंद्रियांचा ज्या पदार्थाशीं संसर्ग होतो, तत्क्षणींच तो जीवात्मा व तो पदार्थ ही दोन्ही नष्ट होतात; त्या प्रमाणेच ज्या क्षणीं जो जीवात्मा जो पदार्थ जाणितो, त्या क्षणींच तो जीवात्मा व तो पदार्थ हे दोन्ही नष्ट होतात. असे मानितां येणे शक्य नाहीं कीं, ज्या जीवात्म्याच्या इंद्रियाचा ज्या पदार्थाशीं संसर्ग झाला त्याच्याहून भिन्न असा दुसरा जीवात्मा तो पदार्थ जाणितो; व ज्या जीवात्म्याने जो पदार्थ जाणिला त्याच्याहून भिन्न असा दुसरा जीवात्मा तो पदार्थ घेतो. आणि क्षणिक जे मानसिक संस्कार त्यांची परंपरा एकच आहे असे जरी मानले, तरी ज्या क्षणिक संस्कारांची ती परंपरा, त्यांच्याहून ती वस्तुतः भिन्न मसल्या मुळे, तिच्या वर अवलंबून राहणारा जो जाणणे, घेणे, टाकणे, इत्यादि व्यवहार त्याची तिच्या मोगाने देखील उपपाते बसवितां येत नाही.'