पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६

वैदिक तत्त्वमीमांसा ही गोष्ट लपवितां येत नाहीं; त्या प्रमाणेच, ज्याला पूर्वी अनुभव आला तो मी नव्हे असें ह्मणून, तो आपला पूर्वीचा अनुभव लपवीत नाहीं. आणि असे असल्या मुळे ज्या क्षणीं पाहलें तो क्षण व ज्या क्षणी स्मरण झालें तो क्षण, या दोन क्षणांशी संबद्ध जो एकच क्रर्ता तो क्षणिक आहे असे प्रतिपादन करणे बरोबर नाहीं, असे सर्वास्तित्ववादीनें कबूल करणे अपरिहार्य आहे. आणि ही गोष्ट कबूल केली, मग या क्षणा पासून मृत्यूपर्यंत एका मागून एक त्याला येणारे असे जे अनेक अनुभव, ते सर्व आपल्या स्वतःचेच आणि ह्मणून त्या सर्वांचा कर्ता एकच अर्स पाहून, आणि जन्मा पासून या क्षणापर्यंतचे व अनुभव आपले स्वतःचेच आणि ह्मणून त्या सर्वांचा आता एकच, असे त्याच्या लक्षात आले, ह्मणजे मग सर्व क्षणिक आहे असे प्रतिपादन करणारा जो सर्वास्तित्ववादी याला लाज कशी वाटणार नाहीं ? या वरून देखील असे सिद्ध होते की, सर्वास्तृित्ववादीचे मृत सयुक्तिक नव्हे,