पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १९५ क्तिक नव्हे. कारण असे प्रतिपादन करणे हे अनुस्मृति नामक जी मनोवृत्ति तिच्या विरुद्ध आहे. प्रत्यक्ष अनुभवा नंतर होणारे त्या अनुभवाचे जे स्मरण ते स्मरण झणजे अनुस्मृति. परंतु ज्याला पूर्वी प्रत्यक्ष अनुभव आला त्यालाच नंतर त्या अनुभवाची अनुस्मृति होणे शक्य असते. एका मनुष्याला जो अनुभव आला त्या अनुभवाची दुसन्या मनुष्याला अनुस्मृति होत नाहीं. इतकेच नव्हे, तर पूर्वी ज्याला अनुभव आला तो व आतां ज्याला अनुभव येत आहे तो, हे दोघे जर एकरूपच नसतील तर,-' मी ते पाहलें, मी हे पाहतों,'–अशा प्रकारचा प्रत्यय येणे तरी शक्य कसे होईल ? आणि जर प्रत्यक्ष अनुभव व त्या अनुभवाची अनुस्मृति या दोन्ही क्रियांचा एक कर्ता असेल तरच, मी ते पाहूलें, मी हे पाहतों,- अशा प्रकारचा प्रत्याभिज्ञारूप अनुभव येणे शक्य होते ही गोष्ट सर्व मनुष्यांना प्रत्यक्षपणे माहीत आहे. जर अनुभव के अनुस्मृति यांचे कर्ते भिन्न असणे शक्य असेल तर, दुसन्याने पाहलें मी स्मरतों, असा प्रत्यय येईल, परंतु कोणालाही असा प्रत्यय येत नाही. उलट पक्षीं ज्या वेळी, त्याने पाहलें असें मी स्मरते, अशा प्रकारचा प्रत्यय येतो त्या वैळी पाहणे व स्मरणे या दोन क्रियांचे दोन भिन्न कर्ते असतात ही गोष्ट देखील सर्वांना माहीत आहे. परंतु,-प्रस्तुत गोष्टी संबंधाने,–“मी ते पाहलें,-असे त्याला स्मरण झालें ह्मणजे पाहणारा व स्मरणारा कतो मी एकच, असे सर्वास्तित्ववादीने देखील कबूल केले पाहिजे. आणि ज्या प्रमाणे अग्नि उष्ण व प्रकाशमान असतो