पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ... वैदिक तत्त्वमीमांसा वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करण्याकरितां योजिलेली जी भाषा तिचा अर्थ करितांना देखील लक्षात ठेविली पाहिजे, असे मानले जाते. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचे माजी गव्हरनर जनरल यांनी आपल्या एका भाषणांत हिंदु लोकांच्या सत्यवादित्वासंबंधानें कांहीं उद्गार काढिले होते, व यो उद्गारांवर बरीच प्रतिकूळ टीका झाली होती. परंतु ही सर्व टीका आपल्या भाषणाचा खरा अर्थ न समजल्या मुळे केली गेली आहे, असे नंतरच्या एका भाषणांत सांगत असतां लार्ड कर्झन म्हणालेः* ज्या मनुव्याने हिंदी लोकांच्या हिताकरितां अविश्रांत श्रम केले, मग ते श्रम सफळे असोत किंवा चुकीच्या मार्गाने केले जावोत, तोच मनुष्य त्यांना दुखविण्याची किंवा मागे ढकलण्याचा प्रयत्न करील, ही गोष्टं संभवते काय ? आजपर्यंत ज्या मनुष्याने आपले सर्व आयुष्य प्राच्य लोकांपासून, त्यांच्या इतिहासापासून, व त्यांच्या संप्रदायांपासून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, हे लोकांपुढे मांडण्यांत घालविलें, आणि प्राच्य लोकांचे धर्म, स्मारक चिन्हें, आणि वाङ्मये यांच्या विषयींच्या ज्याच्या निष्ठे बद्दल त्याच्या स्वतःच्या देशबांधवांनीं त्याची वारंवार निर्भत्सना केलेली आहे, आणि हिंदुस्थानामध्ये असतांना ज्याने स्व-इतर धर्म व विचार यांच्या संबंधाने आपल्या आदराविषय इतका विपुळ पुरावा दिला आहे, असा मनुष्य