पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | १९१ या करितां अभावा पासूनच भावरूप वस्तु उत्पन्न होतात; ते सयुक्तिक नव्हे. कारण, एक तर, क्षणिक नसून ओळखितां येण्या सारख्या सुवर्ण वगैरे ज्या भावयुक्त वस्तु, त्यांच्या पासून अलंकार वगैरे कार्ये उत्पन्न होतात, ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. आणि दुसरे असे की, बीज वगैरे ज्या वस्तूंचे विशिष्ट स्वरूप त्यांचे कार्य उत्पन्न होण्याच्या वेळीं नष्ट झालेले दिसते, त्या संबंधाने देखील असे समजतां नये कीं, नष्ट ह्मणजे अभावरूप झालेली जी पूर्वीची स्थिति ती भावरहित स्थिति, पुढे उत्पन्न झालेली जी भावयुक्त स्थिति, तिचे कारण. तर पूर्वीची बीजरूप स्थिति नष्ट झाली तरी बीजाचे जे अवयव नष्ट न होतां भावयुक्त राहतात, ते अंकुरादिकांचे कारण. सारांश, ज्या अर्थी सशाचे शिंग वगैरे जे अभाव, त्यांच्या पासून भावरूप वस्तु उत्पन्न होतात असा अनुभव नाहीं; आणि सुवर्ण वगैरे ज्या भावयुक्त वस्तु, त्यांच्या पासून भावयुक्त वस्तु उत्पन्न होतात असा अनुभव आहे; त्या अर्थी अभावा पासून भावयुक्त वस्तु उत्पन्न होतात, असे प्रतिपादन करणे ठीक नव्हे. तिसरे असे की, चार स्कंधां पासून चित्त व चैत्त या अंतस्थ वृत्ति उत्पन्न होतात, आणि परमाणू पासून भूतरूप व भौतिकरूप बाह्य वस्तूंचे समुदाय उत्पन्न होतात, असे प्रथम विधान करून नंतर अभावा पासून भावयुक्त वस्तु उत्पन्न होतात अशा प्रतिपादनाने पूर्वी केलेल्या विधाना वर आवरण घातल्या मुळे, सवस्तित्ववादीच्या मता संबंधाने सर्व लोकांना भ्रम उत्पन्न होतो.'