पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० वैदिक तत्त्वमीमांसा दुधा पासूनच दहीं उत्पन्न होणे, एतद्रूप विशिष्ट कारणा पासून विशिष्ट कार्य उत्पन्न व्हावे, हा नियम सार्थ होईल. आणि परस्परांहून अभिन्न असे जे अभाव त्यांच्या पासून भावरूप वस्तु उत्पन्न होतात असे जर मानले, तर शशविषाणादिकां पासून देखील अंकुरादि कार्ये उत्पन्न व्हावीं. परंतु ती त्यांच्या पासून उत्पन्न होतात असा अनुभव येत नाहीं. आतां ज्या प्रमाणे रंगा संबंधानें कमळां मध्ये परस्पर भेद असतो, त्या प्रमाणे अभावां मध्ये देखील परस्पर विशेष असतो, असे जर मानिले तर त्या विशेषा मुळे अभावाला कमळां प्रमाणे भावत्व प्राप्त होईल. परंतु वस्तुतः संशाच्या शिंगा प्रमाणे भावरहित जो अभाव, तो कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीचे कारण असणे शक्य नाहीं. आणि जर भावरूप मानिलेल्या वस्तूंची उत्पत्ति अभावा पासून झालीच, तर त्या सर्व वस्तु अभावमय ह्मणजे भावरहित होतील. परंतु तसे होत नाही. कारण प्रत्येक वस्तूचा जो भावयुक्त स्वभाव, त्या स्वभावाने युक्त अशी ती वस्तु नेहमी आपल्या दृष्टीला पडते. उदाहरणार्थ, मृत्तिकामय ज्या कलश वगैरे वस्तु त्या तंतू पासून उत्पन्न झाल्या असे कोणीही समजत नाहीं; तर त्या मृत्तिके पासूनच उत्पन्न झाल्या असे सर्वांना वाटते. सर्वास्तित्ववादीने जे असे प्रतिपादन केले आहे की, जिचे स्वरूप अविनष्ट व अविकृत् राहते अशी कोणतीही एक वस्तु दुसन्या कोणत्याही वस्तूचे कारण होणे शक्य नाहीं;-ह्मणजे कोणतीही एक वस्तु दुसन्या कोणत्याही वस्तूचे का वेण्या करितां प्रथम तिचे स्वरूप नष्ट झाले पाहिजे;-