पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य अंकुरादीनां उत्पद्यमानत्वात् अभावात् भाव-उत्पात्तः इति मन्यन्ते ।। ( शारीरकभाष्य, २।२।२६ ) ह्मणजे, “ सर्वास्तित्ववादीचे मत सयुक्तिक नव्हे असे मानण्याला आणखी एक कारण असे की, कोणत्याही कार्याचे कारण क्षणिक असून ते कार्यात प्रविष्ट होऊन राहत नाही, असे जे प्रतिपादन करितात त्यांना, अभावा पासून भावरूप वस्तु उत्पन्न होतात, असे कबूल करावे लागते. आणि सर्वास्तित्ववादी तर हे विधान स्पष्टपणे प्रतिपादन करतात. कारण ते असे ह्मणतात कीं, अंकुर उत्पन्न होतो तो नष्ट झालेल्या बीजा पासूनच उत्पन्न होतो; दहीं उत्पन्न होते ते नष्ट झालेल्या दुधा पासूनच उत्पन्न होते; घट उत्पन्न होतो तो नष्ट झालेल्या मृत्तिकेच्या पिंडा पासूनच उत्पन्न होतो. इतकेच नव्हे, तर कारणभूत अशी कोणतीही वस्तु अविनष्ट व अविकृत राहून जर तिच्या पासून कार्य उत्पन्न झाले, तर पाहिजे त्या वस्तू पासून पाहिजे ती वस्तु उत्पन्न होईल. सारांश, बीज वगैरे ज्या कारणभूत वस्तु त्या नष्ट झाल्या तरच अकुर वगैरे जी त्यांची कार्ये तीं उत्पन्न होतात. या वरून असे सिद्ध होतें कीं, अभावा पासूनच भावरूप वस्तु उत्पन्न होतात. सर्वास्तित्ववादीच्या या विधाना संबंधाने शंकराचार्यांचे ह्मणणे असेः-तत्र इदं उच्यते ।....न अभावात् भावः उत्पद्यते । यदि अभावात् भावः उत्पद्येत, अभावत्व-अविशेषात् कारण-विशेष-अभ्युपगमः अनर्थकः स्यात् । न हि बीजादीनां उपमृदितानां यः अभावः तस्य अभावस्य शशविषाणादीनां च, निःस्वभावत्व - अविशेषात्, अभावत्वे