पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ वैदिक तत्त्वमीमांसा पूर्वीच्या क्षणची वस्तु परिनिष्पन्न (ह्मणजे पूर्ण) स्थिती मध्ये विद्यमान असतांच,-ह्मणजे ती नष्ट होऊं लागण्या पूर्वीच,- ती पुढील क्षणीं उत्पन्न होणा-या वस्तूचे कारण होते. परंतु त्याला असे ह्मणतां येणार नाही. कारण मागच्या क्षणीं परिनिष्पन्न स्थिती मध्ये विद्यमान असलेली वस्तु पुढच्या क्षणीं उत्पन्न होणान्या वस्तू संबंधाने क्रिया करिते, असे प्रतिपादन करणे ह्मणजे मागच्या क्षणीं उत्पन्न झालेल्या वस्तूचा पुढच्या क्षणाशी संबंध असतो असे कबूल करणे होय. या संबंधाने सर्वास्तित्ववादी कदाचित् असे ह्मणेल की, मागच्या क्षणीं विद्यमान असणे हीच तिच्या कडून पुढच्या क्षणीं उत्पन्न होणा-या वस्तू संबंधाने केली जाणारी क्रिया. परंतु हे ह्मणणे देखील सयुक्तिक नव्हे. कारण ज्या कारणाचा स्वभाव ज्या कार्या मध्ये प्रविष्ट झालेला नाही, त्या कारणा पासून ते कार्य उत्पन्न होणे शक्य नाहीं. आणि जर सर्वास्तित्ववादी असे कबूल करील की, मागच्या क्षणीं विद्यमान असलेल्या कारणभूत वस्तूचा स्वभाव पुढील क्षण उत्पन्न होणान्या कार्यभूत वस्तू मध्ये प्रविष्ट झालेला असतो; तर कारणभूत वस्तूचा स्वभाव कार्य उत्पत्तीच्या वेळीं विद्यमान असतो असे त्याने कबूल केले पाहिजे,-ह्मणजे क्षणभंगवादाचा त्याग केला पाहिजे. आणि, उलट पक्षीं, जर तो असे ह्मणेल की, ज्या कार्या मध्ये ज्या कारणाचा स्वभाव प्रविष्ट झाललो नाहीं तें कार्य त्या कारणा पासून उत्पन्न होते, तर त्याला असेही ह्मणावे लागेल कीं, पाहिजे त्या वस्तू पासून पाहिजे ती वस्तु उत्पन्न होते,