पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १७९ प्रवृत्ति-अभ्युपगमे च प्रवृत्ति-अनुपरेम-प्रसंगात् ।....तस्मात् समुदाय-अनुपपत्तिः । समुदाय-अनुपपत्तौ च तत्-आश्रया लोक-यात्रा लुप्येत ॥ ( शारीरक-भाष्य, २।२।१८ ) ह्मणजे, ' या मता संबंधाने आमचे ह्मणणे असे की, या मताला आवश्यक असे जे दोन कारणांनीं उत्पन्न होणारे दोन प्रकारचे समुदाय,--ह्मणजे परमाणूंच्या योगाने बनलेल्या ज्या भूतरूप वस्तु व भौतिकरूप वस्तु एतद्रूप एक प्रकारचा ( ह्मणजे बाह्य वस्तूंचा ) समुदाय, आणि पांच स्कंधांच्या योगाने बनलेला दुस-या प्रकारचा ( झणजे आध्यात्मिक वस्तूंचा) समुदाय, ते अस्तित्वात येणे शक्य नाहीं (ह्मणजे त्यांच्या अस्तित्वाचे विवरण करितां येणे शक्य नाहीं). कारण ज्यांच्या पासून हे समुदाय बनावयाचे ते परमाणु व स्कंध चैतन्यरहित आहेत. ही गोष्ट खरी आहे कीं, चित्तरूप जो स्कंध तो सचेतन आहे. तथापि चित्तरूप स्कंधाचे चैतन्य उज्वलित (ह्मणजे आपला व्यापार करण्याला समर्थ) होण्या करितां शरीररूप समुदाय विद्यमान असला पाहिजे. अर्थात्, परमाणूचे व स्कंधांचे समुदाय उत्पन्न होणे शक्य झाले पाहिजे, तर लौकिक अर्थी जो चैतन्यस्वरूप जीवात्मा किंवा परमात्मा त्याच्या सामर्थ्याने ते उत्पन्न झाले पाहिजेत. परंतु सर्वास्तित्ववादी पक्षाच्या मते असा जीवात्मा किंवा परमात्मा विद्यमानच नाहीं. आतां सर्वास्तित्ववादी कदाचित् असें ह्मणेल कीं, परमाणु व स्कंध यांचा स्वभावच असा आहे की, जरी ते चैतन्यरहित ( १ ) न च कर्तारं अनपेक्ष्य अणवः स्कन्धाः च स्वयं एव संघातार्थ प्रवर्तन्ते इति वाच्यं, अनिर्मोक्ष-प्रसंगात् ॥ ( गोविंदानंद)