पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ वैदिक तत्त्वमीमांसा इंद्रियांचे विषय, यांचा भौतिकरूप बाह्य वस्तू मध्ये समावेश होतो. पृथ्वी वगैरे जीं चार मूळ तत्त्वे, ती त्या त्या मूळ तत्त्वाच्या परमाणूच्या समुदायांनी बनलेली आहेत, असे ते मानितात. त्यांच्या मते काठिण्य हा पृथ्वीच्या परमाणूंचा स्वाभाविक धर्म, स्थिग्धता हा उदकाच्या परमाणूंचा स्वाभाविक धर्म, उष्णता हा अग्नीच्या परंमाणूचा स्वाभाविक धर्म, आणि चलन हा वायूच्या परमाणूंचा स्वाभाविक धर्म, त्या प्रमाणेच, रूपस्कंध, विज्ञानस्कंध, वेदनास्कंध, संज्ञास्कंध, आणि संस्कारस्कंध, असे जे पांच स्कंध ते मिळून सर्व व्यवहाराला आवश्यक आणि उपयुक्त असें जें अंतस्थ जग ते बनलेले असते. ' (१) सविषयााण इन्द्रियाणि रूपस्कन्धः । रूप्यमाण-पृथिव्यादीनां बाह्यत्वे अपि,देहस्थत्वात् इन्द्रिय-संबन्धात् च आध्यात्मिकत्वम् । अहं-इति-प्रत्ययः विज्ञानस्कन्धः ॥ ( आनंदगिरि ) या प्रिय-अप्रियअनुभव-विषय-स्पर्श सुख-दुःख-तत्-रहित-विशेष-अवस्था चित्तस्य जायते, सः वेदनास्कन्धः ॥ ( वाचस्पति ) गौः अश्वः इत्यादि-शब्द संजल्पित-प्रत्ययः संज्ञास्कंन्धः ॥ ( आनंदगिरि ) राग-द्वेष-मोह-धर्मअधर्माः संस्कारस्कन्धः । तत्र विज्ञानस्कन्धः चित्तं आत्मा इति गीयते । अन्ये चत्वारः स्कन्धाः चैत्ताः तेषां संघातः आध्यात्मिकः, सकल-लोक-यात्रा-निर्वाहकः इत्यर्थः ॥ ( गोविंदानंद ) ह्मणजे, रूपस्कन्ध ह्मणजे इंद्रिये आणि इंद्रियांचे विषय यांचा समुदाय. जरी पृथ्वी वगैरे यांच्या संबंधानें रूप वगैरे विषय बाह्य वस्तु सध्ये समाविष्ट होतात, तरी ते शरीरा मध्ये असल्या मुळे व त्यांचा इंद्रियांशी संबंध असल्या मुळे, त्यांचा अंतस्थ वस्तू मध्ये देखील समावेश होतो. मी असा जो अहंकाररूप अनुभव तो अनुभव ह्मणजे विज्ञानस्कंध. प्रिय किंवा अप्रिय वस्तूचा इंद्रियांशी संबंध झाला असतां प्राप्त होणारा सुखाचा किंवा दुःखाचा किंवा सुखदुःखरहित असा, जो अनुभव तो अनुभव ह्मणजे वेदनास्कंध. गाई, अश्व, वगैरे शब्द ऐकल्या मुळे उत्पन्न होणारा जो अनुभव तो अनुभव ह्मणजे संज्ञास्कंध.. आसक्ति,