पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वैदिक तत्त्वमीमांसा तत्त्वमीमांसकासंबंधानें असें ह्मटलें आहेः-कॅटच्या ग्रंथांवर ज्यांनी भाष्ये लिहिलीं त्यांनी कॅटचा जो मूळ उद्देश त्या ‘उद्देशाच्या निरनिराळ्या अंगांला निरनिराळे महत्व दिल्यामुळे | निरानराळ्या भाष्यकारांनी त्याचा उद्देश भिन्न भिन्न रूपाने निर्दिष्ट केला आहे'. (The object, which Kant had in view,...has been variously stated by different commentators, according as they have attached more or less importance to particular aspects of it. I. 227.) नंतर कॅटच्या मतांसंबंधानें | परस्परविरुद्ध अशी जी विवेचने केली गेली आहेत त्यांची कांहीं उदाहरणे देऊन डॉ. केअर्डन असे झटले आहेःही गोष्ट निःसंशय आहे की, यां पैकी प्रत्येक विवेचनाच्या समर्थनार्थ कॅटच्या ग्रंथांमधून उतारे देता येतील. कारण कॅटचा उद्देश फार व्यापक होता; आणि ह्मणून एका दृष्टीने, किंवा त्याच्या तत्त्वमीमांसेच्या एका विशिष्ट भागाचा स्वतंत्रपणे विचार केला असतां, जी गोष्ट साध्य असे वाटते, तीच गोष्ट पुनः दुसन्या भागांसंबंधाने पाहिली असतां केवळ साधनीभूत आहे असे वाटू लागते. याप्रमाणे, कॅटच्या 'क्रिटिक' नामक तत्त्वमीमांसेचे जे निरनिराळे ग्रंथरूप भाग आहेत, त्यांपैकी प्रत्येक ग्रंथाचा एक प्रत्यक्ष उद्देश असून तो उद्देश त्या सर्व मीमांसेचा जो एकंदरीत किंवा मुख्य उद्देश त्या उद्देशाहून भिन्न आहे. आणि यामुळे त्याच्या ग्रंथांपैकी कोणत्याही एका ग्रंथाचा