पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १७५ (१३) परंतु बाह्य जग आणि अंतस्थ जग ही दोन्ही विद्यमान किंवा सत्य आहेत, असे सर्वास्तित्ववादी किंवा क्षणभंगुरवादी या नांवाने वैदिक वाङ्मयांत जो पक्ष प्रसिद्ध आहे तो देखील प्रतिपादन करी. परंतु या क्षणभंगुरवादी पक्षाचे मत असे की, बाह्य किंवा अंतस्थ कोणतीही वस्तु ज्या क्षणीं ती उत्पन्न होते त्या एका क्षणाच्या पलीकडे अस्तित्वांत राहत नाहीं, ती त्या क्षणींच नष्ट होते. हे मत देखील शंकराचार्य व रामानुजाचार्य यांना मान्य नाहीं. | शंकराचार्यांच्या भाषेनें क्षणभंगुरवादीचे मत असें:- तत्र ये सर्वास्तित्ववादिनः बाह्यं आन्तरं च वस्तु अभ्युपगच्छन्ति, भूतं भौतिकं च, चित्तं चैत्तं च, तान् तावत् प्रतिब्रूमः । तत्र भूतं पृथिवी-धातु-आद्यः । भौतिक रूप आदयः चक्षुः- आद्यः च । चतुष्टये च पृथिव्यादि-परमाणवः खर-स्नेह-उष्ण-ईरण-स्वभावाः ते पृथिव्यादि-भावेन संहन्यन्ते इति मन्यन्ते । तथा रूप-विज्ञान-वेदना-संज्ञासंस्कार-संज्ञकाः पंच-स्कन्धाः । ते अपि आध्यात्म सर्व-व्यवहार-आस्पद-भावेन संहन्यन्ते इति मन्यन्ते ॥ ( शारीरकभाष्य, २।२।१८) ह्मणजे, * बाह्य आणि अंतस्थ सर्व वस्तु सत्य आहेत, असे मान्य करणारे जे सर्वास्तित्ववादी त्यांच्या मता विषयी विचार करूं. ते असे प्रतिपादन करितात की, बाह्य वस्तु भूतरूप किंवा भौतिकरूप असतात, आणि अंतस्थ वस्तु चित्तरूप किंवा चैत्तरूप असतात. पृथ्वी, उदक, अग्नि, वायु, या मूळ तत्त्वांचा भूतरूप बाह्य वस्तू मध्ये समावेश होतो. चक्षु वगैरे पांच इंद्रिये आणि रूप वगैरे त्या