पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । १७३ घरील विवेचना वरून असे निश्चितपणे स्पष्ट होते कीं, शून्यवाद आणि विज्ञानवाद ही दोन्ही मते शंकराचार्य व रामानुजाचार्य यांना मान्य नाहींत. ह्मणजे बाह्य जग व अंतस्थ जग ही दोन्ही असत् किंवा अभावरूप आहेत हे मत त्यांना मान्य नाहीं; आणि विज्ञानरूप अंतस्थ जग मात्र विद्यमान असून बाह्य जग अविद्यमान किंवा अभावरूप आहे, हे मत देखील त्यांना मान्य नाहीं. अर्थात्, बाह्य जग व अंतस्थ जग ही दोन्ही विद्यमान किंवा भावः क्लप आहेत, असे ते प्रतिपादन करितात, व्यतया तदानों न भवन्ति, तथापि तत्-तत्-पुरुष-मात्र-अनु. आव्यतया तथाविध-अर्थानं ईश्वरः सृजति००॥ (श्रीभाष्य, १॥१॥१)