पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ वैदिक तत्त्वमीमांसा जें ज्ञान ते जाग्रत् अवस्थे मध्ये प्राप्त होणा-या ज्ञानाहून भिन्नस्वरूप असल्या मुळे, त्याच्या योगाने बाह्य पदार्थांचा अभाव सिद्ध करितां येणार नाही. कारण स्वप्ना मध्ये जे ज्ञान प्राप्त होतें तें निद्रेच्या योगाने इंद्रिये दूषित झाल्या मुळे प्राप्त होते; व ते जाग्रत् अवस्थेच्या वेळीं बाधित होते,-ह्मणजे ते खरे ज्ञान नव्हे असे सिद्ध होते. परंतु जाग्रत् अवस्थेमध्ये प्राप्त होणारे जें ज्ञान ते याच्या उलट असल्या मुळे, या दोन प्रकारच्या ज्ञानां मध्ये साम्य आहे असे ह्मणणे बरोबर नाहीं. पुनः, जर सर्वच प्रत्यक्ष ज्ञाने विषयरहित असतात असे मानले, तर विज्ञानवादीला जी गोष्ट अनुमानाने सिद्ध करावयाची आहे ती देखील सिद्ध होणार नाही. कारण विषयरहित जे प्रत्यक्ष ज्ञान त्याच्या वर अवलंबून राहणारें अनुमानज्ञान देखील विषयरहित होईल. उलट पक्षीं, जर त्या अनुमित ज्ञानाचा विषय विद्यमान असेल, तर इतर ज्ञानां मध्येही ज्ञानत्व असल्या मुळे त्यांचे विषय अविद्यमान आहेत, असे सिद्ध होणार नाहीं. इतकेच नव्हे, तर विषयाहत असे ज्ञान विद्यमान असते असें ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण असे ज्ञान केव्हांच कोणाच्याही अनुभवाला येत नाहीं. ह्मणजे ज्या ज्ञानाला कर्ता नाही किंवा कर्म नाहीं, अशा ज्ञानाचा अनुभव येणें सर्वथैव अशक्य होय. स्वप्न अवस्थे मध्ये जे ज्ञान प्राप्त होते ते देखील विषयरहित असत नाही, असे आह्मी पूर्वीच प्रतिपादन केले आहे. (१) स्वप्ने च प्राणिनां पुण्य-पाप-अनुगुणाः भगवता एवं तत्-तत्-पुरुष-मात्र-अनुभाव्याः तत्-तत्-काल-अवसानाः तथा भूताः च अर्थाः सुज्यन्ते ।...यद्यपि सकल-इतर-पुरुष-अनुभाव