पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ वैदिक तत्त्वमीमांसा वासना उत्पन्न होतात. परंतु पदार्थांच्या अभाव, किंवा जर पदार्थी विषयीं ज्ञानच प्राप्त झाले नाही तर, निरनिराळ्या प्रकारच्या वासना कशी उत्पन्न होतील? या वासना अनादि आहेत असे झटले, तर त्याच्या योगाने विज्ञानवादीचे मत सिद्ध न होता, अंधपरंपरेच्या न्यायाने सर्व व्यवहाराचा लोप करणारी व निराधार अशी अनवस्था मात्र उत्पन्न होईल. यो वरून असेही स्पष्ट होतें कीं, वासनांच्या योगानें ज्ञानाची उत्पत्ति होते,- बाह्य पदार्थांच्या योगाने नव्हे, अशा प्रकारचा विज्ञानवादीने आपले मत सिद्ध करण्या करितां जो अन्वयव्यतिरेक पुढे आणिला आहे, तो देखील सयुक्तिक नव्हे. कारण जर पदार्थों विषयी ज्ञान प्राप्त झालें नाहीं तर वासनांची उत्पत्ति होणे शक्य नाहीं. इतकेच नव्हे, तर ज्या अर्थी वासनांच्या अभावी देखील पदार्थी विषयीं ज्ञान प्राप्त होते, परंतु पदार्थांच्या अभावीं वासना उत्पन्न होणे शक्य नाही. त्या अर्थी अन्वयव्यतिरेकाच्या योगाने बाह्य पदार्थांची विद्यमानताच सिद्ध होते. दुसरे असें कीं, वासना हे विशेष प्रकारचे संस्कार आहेत. परंतु ही गोष्ट सर्वांना माहीत आहे कीं, कांहीं तरी आश्रया शिवाय संस्कार उत्पन्न होणे शक्य नाही. परंतु विज्ञानवादीच्या मता प्रमाणे संस्कार उत्पन्न होण्याला कोणताच आधार नाहीं. कारण त्याच्या मते तसा कोणताही आधार प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने उपलब्ध नाहीं, अर्थात्, तो विद्यमान नाहीं.' * या आक्षेपाला विज्ञानवादीचे एक उत्तर कल्पून त्याचे शंकराचार्यांनी निराकरण केले आहे ते असे:-यत् अपि आय-विज्ञानं नाम वासना-आश्रयत्वेन परिकल्पितं, तत् आप