पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | १६५ सत्य ठरत नाहीत. दुसरे असे कीं, स्वप्ना मध्ये जे ज्ञान प्राप्त होते ते स्मृतिरूप असते, परंतु जाग्रत् अवस्थे मध्ये जे ज्ञान प्राप्त होते ते प्रत्यक्षज्ञान असते. आणि स्मृतिरूप ज्ञान व प्रत्यक्ष ज्ञान यांच्या मधील भेद प्रत्येकाला स्वत:च्या अनुभवाने माहीत असतो. स्मृतिरूप ज्ञानाच्या वेळी त्या ज्ञानाच्या विषयाचा इंद्रियाशीं संसर्ग झालेला नसतो, प्रत्यक्ष ज्ञानाच्या वेळी त्या ज्ञानाच्या विषयाचा इंद्रियाशीं संसर्ग झालेला असतो. उदाहरणार्थ, “ माझ्या प्रिय पुत्राचे मला स्मरण होते, परंतु तो मला दिसत ( किंवा भेटत ) नाहीं, त्याची भेट व्हावी असे मी इच्छितों. या प्रमाणे स्वप्न–अवस्थे मध्ये प्राप्त होणारे ज्ञान व जाग्रत्-अवस्थे मध्ये प्राप्त होणारे ज्ञान, यांच्या मधील भेदा विषयीं स्वत:ला अनुभव असून, केवळ दोन्ही अवस्थां मधील ज्ञाने अनुभवरूप असतात एवढ्याच मुळे, स्वप्न-अवस्थे मधील ज्ञाना प्रमाणेच जाग्रत्अवस्थे मधील ज्ञान देखील भ्रमरूप होय, असें ह्मणणे सयुक्तिक नव्हे. आणि स्वतःच्या अनुभवा विरुद्ध प्रतिपादन करणे हे स्वतःला शहाणा मानणान्या मनुष्याला शोभत नाहीं. विज्ञानवादीच्या विचारसरणी वरून असे दिसतें कीं, जाग्रत् अवस्थे मध्ये जे ज्ञान उपलब्ध होते ते निराधार असते,–ह्मणजे ते ब्राह्य पदार्थाच्या अभावीं उत्पन्न होते, असे प्रत्यक्षतः प्रतिपादन करणे हे अनुभवा विरुद्ध असल्या मुळे, ते प्रतिपादन करण्या करितां विज्ञानवादी स्वप्नज्ञान व प्रत्यक्ष ज्ञान यांच्या मधील अनुभवरूप साधम्र्याचे अवलंबन कारितो, परंतु जो ज्या पदार्थाचा स्वतःचा धर्म असणे शक्य नाहीं ती त्याचा धर्म असे,