पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ वैदिक तत्त्वमीमांसा सणजे, ' बाह्य पदार्थ विद्यमान नाहींत असे प्रतिपादन करणारा जो बिज्ञानवादी, त्याने असे झटले आहे की, जाग्रत्-अवस्थे मध्ये आपणांला जें स्तंभादिकां विषयीं ज्ञान होते, ते स्वप्ना मध्ये होणा-या ज्ञाना प्रमाणेच अनुभवरूप असल्या मुळे, ज्या प्रमाणे स्तंभादि बाह्य पदार्थांच्या अभावीं स्वप्ना मध्ये त्यांच्या विषयीं ज्ञान होते, त्या प्रमाणेच जाग्रत्-अवस्थे मध्ये देखील त्यांच्या अभावी त्यांच्या विषयीं ज्ञान होते. परंतु त्याचे हे ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण जाग्रत् अवस्था व स्वप्न-अवस्था यांच्या मध्ये भेद आहे. हा भेद कोणता ? या प्रश्नाला उत्तर असे की, स्वप्न-अवस्थे “मध्ये जे पदार्थ दिसतात ते जाग्रत्-अवस्थे मध्ये असत्य ठरतात; परंतु जाग्रत् अवस्थे मध्ये पाहलेले पदार्थ केव्हांही असत्य ठरत नाहींत. उदाहरणार्थ, स्वप्ना मध्ये आपणांला असा अनुभव येतो कीं, आपण महाजनांच्या समागमा मध्ये हा. परंतु जाग्रतु-अवस्था प्राप्त झाल्या बरोबर आप णांला असे समजून येते की, निद्रेच्या योगाने मनाला ग्लानि आली होती, व त्या मुळे ही भ्रम उत्पन्न झाला; वस्तुतः आपणांला महाजनांचा समागम झाला नाहीं. हीच गोष्ट जादु बगैरे संबंधानें लागू पडते. परंतु जाग्रत्अवस्थे मध्ये स्तंभ वगैरे ज्या पदार्थांचा आपणाला अनुभव येतो, ते पदार्थ कोणत्याही अबस्थे मध्ये अ तदा किं दृष्टान्तेन, बाधितस्य दृष्टान्त-सहस्रेण अपि दुःसाध्यत्वात् । अतः स्वतः निरालंबनत्व-उक्त सालंबनत्व-अनुभव-बाध-भिया त्वया अनुमातुं आरब्धं, तथापि माधः न मुचति इत्यर्थः ॥ ( गोविंदानंद )