पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६१ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य सल्या मुळे जरी त्यांच्या मध्ये ज्ञेय व ज्ञाती असा संबंध असणे शक्य नाहीं; तरी बिज्ञान व जीवात्मा यांचे स्वभाव परस्पर भिन्न असल्या मुळे, त्यांच्या मध्ये तो संबंध असुं शकेल. आणि जीवात्म्याचे अस्तित्व स्वयंसिद्ध असल्या मुळे ते कोणालाही नाकबूल करितां येणार नाहीं. प्रदीपा प्रमाणे प्रकाशमान असल्या मुळे, स्वतःहून भिन्न अशा विज्ञात्या शिवाय विज्ञान स्वतःच जाणिले जाते, असे विज्ञानवादीने प्रतिपादन करणे ह्मणजे कोणत्याही ज्ञानसाधनाच्या योगाने व कोणत्याही विज्ञात्या कडून जाणिलें न जाणारे असे विज्ञान विद्यमान आहे असे प्रतिपादन करणे होय. आणि असे प्रतिपादन करणे ह्मणजे निबिड अशा खड्कांच्या समुदायाच्या आंत असलेले सहस्रावधि दीपक त्या खडकांच्या बाहेर आपला प्रकाश पाडितात, असेंह्मणण्या प्रमाणे आहे. या वर विज्ञानवादी कदाचित असे ह्मणेल की, “ होय मी असेच ह्मणतों. मात्र ज्या अर्थी विज्ञान अनुभवरूप आहे असे तुह्मी कबूल करीत आहां, त्या अर्थी तुझी माझे ऋणणे देखील कबूल केले असे होते. परंतु ( शंकराचार्यांच्या मते ) विज्ञानवादीचे हे ह्मणणे बरोबर नव्हे. कारण जरी दीपक प्रकाशमान असतो, तरी तो दृश्यमान होण्या करितां, त्याच्याहून भिन्न व ज्याच्या जवळ पाहण्याचे नेत्ररूप साधन आहे असा, पाहणारा विद्यमान असला पाहिजे. त्या प्रमाणेच जरी दीपका प्रमाणे विज्ञाना मध्ये अवभास्यत्व किंवा ज्ञेयत्व असले; तरी ज्या प्रमाणे दीपक पाहणारा कोणी असेल तरच त्याला दीपक दिसतो, त्या प्रमाणे विज्ञानाहून भिन्न असा कोणी विज्ञाता असेल तरच त्याच्या कडून विज्ञान जाणिले जाईल. आतां शेवटीं विज्ञान