पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ । वैदिक तत्त्वमीमांसा जर ज्ञानाचा विषय अविद्यमान असेल, तर ज्ञानाचे रूप विषयाच्या रूपा सारखे कसे असू शकेल? शिवाय, बाह्य पदार्थ आपल्या अनुभवाला येतात या करितां तद्विषयक कल्पना व्यर्थ नव्हे. याच कारणा करितां कोणतेही ज्ञान व त्या ज्ञानाचा विषय यांचा अनुभव एकाच वेळीं येतो, या वरून देखील असे सिद्ध होत नाहीं की, ज्ञान व ज्ञानाचा विषय एकच; तर एवढेच की, कोणतेही ज्ञान व त्या ज्ञानाचा विषय यांच्या मध्ये साध्यसाधनरूप संबंध असतो. त्या प्रमाणेच, हे घटविषयक ज्ञान हे पटविषयक ज्ञान, असे जेव्हा आपण ह्मणतों, तेव्हां ६६ घटविषयक व पटविषयक ' हीं जीं ज्ञानाचीं विशेषणे त्यांच्या मध्ये परस्पर भेद असतो, ह्मणजे ती दोन असतात; परंतु या विशेषणांचे विशेष्य जे ज्ञान तें एकरूपच ह्मणजे एकच असते. ज्या प्रमाणे हा पांढरा बैल आहे हा काळा बैल आहे, असे जेव्हा आपण । ह्मणतों, त्या वेळी पांढरेपणा व काळेपणा यांच्या मध्ये भेद आहे ह्मणजे ते दोन आहेत, असे मानले पाहिजे; परंतु बैलाचा जो (बैलपणा नामक) स्वभाव तो भेदरहितच ह्मणजे एकच असतो, त्या प्रमाणे. परंतु ज्या दोन गोष्टी आहेत त्या, जी एक गोष्ट आहे, तिच्याहून भिन्न असल्या पाहिजेत; तसेच, जी एक वस्तु आहे ती, ज्या दोन वस्तु आहेत, त्यांच्याहून भिन्न असली पाहिजे. या वरून असे स्पष्ट होते की, एकच जे ज्ञान ते, अनेक जे बाह्य पदार्थ, त्यांच्याहून भिन्न आहे. हीच गोष्ट घटविषयक दर्शन व घटविषयक स्मरण यांच्या संबंधाने लागू पडते. ह्मणजे या उदाहरणांत, दर्शन व स्मरण या विशेष्यां मध्ये भेद आहे ह्मणजे ती दोन आहेत. परंतु