पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १५५६ ह्मणजे, ' या संबंधानें विज्ञानवादी असे ह्मणेल कीं, बाह्य पदार्थ विद्यमान असणे शक्य नसल्या मुळे, प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने दृश्यमान जो बाह्य पदार्थ तो 4 बाह्य पदार्थी सारखा दिसतो असे आह्मी मानितों. परंतु (शंकराचार्यांच्या मते) असे मानने योग्य नव्हे. कारण प्रत्यक्षादि जी प्रमाणे ह्मणजे ज्ञानविषयक साधने, त्यांच्या प्रवृत्तीला व अप्रवृत्तीला अनुसरून,-ह्मणजे कोणत्या वस्तु त्यांच्या योगाने गम्य आहेत व कोणत्या वस्तु अगम्य आहेत या विषयीं प्रथम निश्चय करून नंतर,-कोणत्याही गोष्टीच्या शक्यते संबंधाने किंवा अशक्यते संबंधाने निर्णय केला पाहिजे;-कोणतीही गोष्ट शक्य आहे किंवा अशक्य आहे असा पूर्वी निर्णय करून, मग त्या निर्णयाच्या आधाराने प्रत्यक्षादि प्रमाणांच्या प्रवृत्ती विषयी किंवा अप्रवृत्ती विषयीं निर्णय करितां नये. प्रत्यक्षादि जीं ज्ञानविषयक साधने त्यां पैकी कोणत्याही साधनाच्या योगानें जी गोष्ट उपलब्ध असते, ती शक्य आहे असे मानले पाहिजे; आणि प्रत्यक्षादि ज्ञानविषयक साधनां पैकी कोणत्याही साधनाने जी गोष्ट उपलब्ध नाहीं, ती अशक्य आहे असे मानिले पाहिजे. आणि हा नियम लक्षात ठेविला; ह्मणजे मग त्याच्या त्याच्या स्वाभाविक शक्ती प्रमाणे प्रत्येक ज्ञानविषयक साधनाच्या योगाने जे बाह्य पदार्थ उपलब्ध होतात ते, व्यतिरेक आणि अव्यतिरेक असे पक्षांतर उत्पन्न करून त्यांच्या आधारा वर, विद्यमान नाहींत असे कसें ह्मणतां येईल? त्या प्रमाणेच, कोणतेही. ज्ञान आणि त्या ज्ञानाचा विषय यांचे रूप सारखे असते, ह्मणून ज्ञानाचा विषय अविद्यमान मानिला |पाहिजे, असे जे विज्ञानवादी ह्मणतो ते सयुक्तिक नव्हे, कारण